सरकारने केला शेतकऱ्यांचा विश्‍वासघात – अजित पवार

बारामती – कर्जमाफीच्या वल्गना करुन सरकारने शेतकऱ्यांचा विश्‍वासघात केला आहे. कर्जमाफीच्या घोषणा केल्या मात्र त्यामध्ये जाचक अटी लावल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा होणार नाही याची दक्षता सरकारने घेतली आहे. असे असले, तरी कार्जमाफीसाठी लावलेले निकष बदलायला सरकारला भाग पाडणार असल्याचा इशारा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला. बारामती येथील एका आयोजित कार्यक्रमानंतर पवार पत्रकारांशी बोलत होते.

पवार म्हणाले की, कर्जमाफी जाहीर करुन सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम केले आहे. एकीकडे कर्जमाफी जाहीर करायची, तर दुसरीकडे निकष लावायचे त्यामुळे शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार का हा खरा प्रश्‍न आहे. शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. कर्जमाफीसाठी शब्दांचा खेळ केला आहे. शब्दांचा खेळ करुन शेतकऱ्यांची कोंडी करण्याचा हा प्रयत्न आहे. सहजासजी शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा होऊ नये असाच सरकारचा प्रयत्न राहिला आहे. शब्दांचा खेळ करुन सरकारने शेतकऱ्यांना फसवले आहे. याबाबत मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी मोबाईलवरुन संवाद साधला आहे. श्रीमंत शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली नाही, तरी चालेल मात्र, गरीब व गरजु शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे, आशा सुचना त्यांना केल्या असल्याच अजित पवार सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)