सरकारने लोकशाहीचा गळा दाबला-प्रकाश आंबेडकर

मुंबई : कोरेगाव-भीमाप्रकरणी संभाजी भिडेंना अटक करण्यासाठी काढण्यात येणाऱ्या एल्गार मोर्चाला सरकारने परवानगी नाकारून लोकशाहीचा गळा दाबला आहे. सरकारने आंदोलन करण्याचा अधिकार नाकारल्याचे सांगतानाच मोर्चासाठी राज्यभरातून जनता निघाली असून उद्या मोर्चा निघणारच, असे भारिप-बहुजन महासंघाचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले.

संभाजी भिडे यांच्या अटकेसाठी उद्या सोमवारी प्रकाश आंबेडकर यांनी मोर्चाची हाक दिली आहे. राणी बाग ते आझाद मैदान अशी ही रॅली निघणार आहे. मात्र पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारल्याने आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेऊन कोणत्याही परिस्थितीत मोर्चा निघणार असल्याचे स्पष्ट केले. मोर्चासाठी महाराष्ट्रभरातून जनता निघाली आहे. त्यांना आता रोखणे कठीण आहे. त्यामुळे उद्या आम्ही सीएसएमटीला जमणार आहोत. त्यानंतर पुढची दिशा ठरवणार असल्याचे आंबेडकर यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)