सरकारने लोकशाहीचा गळा दाबला – प्रकाश आंबेडकर

मुंबई  – भीमा-कोरेगाव दंगलप्रकरणी एकबोटेंच्या अटकेनंतर संभाजी भिडे यांनाही अटक करण्यात येईल, अशी आमची अपेक्षा होती. मात्र, सरकारकडून त्याबाबत कोणतीही हालचाल दिसत नाही. तसेच सरकारने आंदोलनाला परवानगी नाकारून एक प्रकारे लोकशाहीचाच गळा दाबला आहे, अशी जोरदार टिकाही असे भारिप-बहुजन महासंघाचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी केली.

प्रकाश आंबेडकर म्हणाले, मोर्चासाठी महाराष्ट्रभरातून जनता निघाली आहे. त्यांना आता रोखणे कठीण आहे. त्यामुळे उद्या आम्ही सीएसएमटीला जमणार आणि तिथे काय तो निर्णय होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. ज्यांनी मार खाल्ला त्यांच्यावर बंदी घालतात आणि ज्यांनी मारले त्यांना मोकाट सोडले जात आहे. हा प्रकार म्हणजे सैतानाला पाठीशी घालायचे आणि सावाला मारायचे, अशी सरकारची भूमिका असल्याचा हल्लाबोल त्यांनी केली.

माझ्याबाबतीत कुणाला राजकीय भीती असण्याचे कारण नाही. कारण मला कुठलेही मंत्रीपद कधीच नको होते. या सरकारने आणि आधीच्या सरकारनेही मला मंत्रीपद ऑफर दिली होती, असेही आंबेडकर म्हणाले. संभाजी भिडेंच्या अटकेसाठी उद्या मुंबईत निघणाऱ्या एल्गार रॅलीला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. राणी बाग ते आझाद मैदान अशी ही रॅली आयोजित करण्यात आली आहे. मात्र परीक्षा सुरू असल्याने रॅली काढू नका, असे सांगत पोलिसांनी रॅलीला परवानगी नाकारली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)