सरकारने बैलगाडा शर्यत त्वरीत सुरू करावी

चिंबळी- ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा आवडता खेळ म्हणजे बैलगाडा शर्यत या खेळावर न्यायालयाने बंदी घातल्याने नाराजी पसरली आहे, ही त्वरीत बंदी उठवावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
मध्यतंरी जिल्हात स्पर्धा सुरू झाल्यामुळे लाखो रूपयांचे बक्षीस ठेवून स्पर्धा आयोजित केल्या होत्या. परंतु प्राणी मित्र संघटनेने शेतकंऱ्याच्या आनंदावर पाणी फिरवले. या संघटनेने या निर्णयाविरोधात न्यायालयात याचिका दाखल केली. त्यामुळे न्यायालयाने या स्पर्धेवर परत चार दिवसात बंदी घातली. सध्या जिल्हाच्या ग्रामीण भागात यात्रा सुरू झाल्या आहेत. या यात्रामध्ये विशेष करून बैलगाड्यांच्या स्पर्धा हा मुख्य कार्यक्रम असतो. परंतु या स्पर्धा होणार नसल्यामुळे गावागावामधील यात्रावर मोठा परिणाम होत आहे. कारण शेतकऱ्यांचा आवडता खेळ बैलगाडा हा असल्याने जर खेळच होणार नसल्यामुळे शेतकरी ग्रामस्थ यात्रेमध्ये येत नाही. याचा परिणाम यात्रेवर होऊन येथे येणारी जी लहान मोठी दुकाने आहेत. या दुकानावर त्याचा परिणाम होणार आहे. अनेक दुकानदारांना ग्राहकच नसल्यामुळे त्याचे नुकसान होऊ लागले आहे. तसेच अनेक व्यवसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे.
खेड, जुन्नर, आंबेगाव, हवेली, शिरूर, मावळ, मुळशी असा अनेक तालुक्‍यांमधील शेतकरी या बैलांना आपल्या लहान मुलाप्रमाणे वागवतात. त्याच्यांवर जीवापाड प्रेम करतात. या बैल गाड्यांचा स्पर्धा होतील या आशेने या भागातील शेतकरी या बैलांना कर्ज काढून खायाला घालीत आहेत. तर काही शेतकऱ्यांनी लाख लाख रूपये खर्चाचे बैल घेतले आहे. परंतु हा खेळ सुरू होत नसल्यामुळे लाख रूपायांचा बैल काही हजारात विकत आहे. तर काही बैलगाडा मालक हौस म्हणून लग्नसभारंमात बैलाची मिरवणुक माडंव टहाळे मिरवणुक काढून भंडाराची व फटाक्‍यांची आतिषबाजी करीत बैलगाडा शर्यतीत धावणाऱ्या बैलांची संगीत वाद्यांच्या गजरात संपूर्ण गावात भव्य मिरवणुक काढून हौस करत असल्याचे चित्र सद्या पाहायला मिळत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)