सरकारने उत्तरदायित्व निभावले नाही – गुलामनबी आझाद

संसदेतील गोंधळाबाबत गुलामनबी आझाद यांचा आरोप
नवी दिल्ली – गेले दहा बारा दिवस संसदेत गोंधळाची स्थिती आहे, पण ही स्थिती दूर करण्याची नैतिक जबाबदारी सरकारची असताना सरकारने याबाबतीतले आपले उत्तरदायित्व निभावलेले नाही असा आरोप राज्यसभेतील विरोधी पक्ष नेते गुलामनबी आझाद यांनी केला आहे. ते म्हणाले की राज्यसभा सदनाचे काम व्यवस्थीत चालावे आणि महत्वाच्या विषयावर चर्चा व्हावी अशी आमचीही भूमिका आहे पण सरकारने विरोधकांशी समन्वयच साधण्याचा प्रयत्न केला नाही ही दुर्देवी बाब आहे असे ते म्हणाले.

विदेश मंत्री सुषमा स्वराज यांनी इराकधील 39 भारतीयांच्या हत्येबद्दलचे निवेदन सभागृहात केले त्यावेळी विरोधी सदस्यांनी काहीं काळ गोंधळ थांबवला होता. त्यानंतर लगेच गुलामनबी आझाद यांनी निवेदन केले.परंतु त्यावेळी गोंधळ सुरूच राहिला. त्यावेळी बहुतेक पक्षांनी आझाद यांना निवेदन करू द्यावे अशी सुचना गोंधळी खासदारांना केली. पण त्याकडे दुर्लक्ष करून द्रमुक, अद्रमुक, तसेच आंध्रतील तेलगु देमस पक्षाच्या खासदारांची घोषणाबाजी सुरूच राहिली. हा गोंधळ थांबवण्यासाठी सरकारने पुढाकार घ्यायला हवा असे आझाद यांचे म्हणणे होते. पण त्यांच्या म्हणण्याला सरकारतर्फे रविशंकरप्रसाद यांनी आक्षेप घेतला. ते म्हणाले की कोणत्याही विषयावर चर्चा करण्यास सरकारची तयारी आहे असे आम्ही पहिल्यापासून सांगितले आहे. पण गोंधळ निर्माण करणाऱ्या पक्षांशी सरकारने चर्चा का केली नाही हे मात्र त्यांनी नमूद केले नाही.

आझाद यांनी सांगितले आज सकाळी कॉंग्रेस, तृणमुल कॉंग्रेस, समाजवादी पार्टी, बहुजन समाज पार्टी, द्रमुक, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी, दोन्ही कम्युनिस्ट अशा दहा पक्षांच्या नेत्यांची आम्हीच बैठक घेतली. राज्यसभेचे कामकाज सुरळीत सुरू राहावे अशी भूमिका या पक्षांनी मांडली आहे असे ते म्हणाले. पीएनबी बॅंकेतील घोटाळा, आंध्रप्रदेशला नाकारण्यात आलेला विशेष राज्याचा दर्जा आणि कावेरी लवाद या तीन विषयांवर चर्चा व्हावी अशी या दहा पक्षांची मागणी आहे असे ते म्हणाले. त्यांचे निवेदन संपल्यानंतर लगेच राज्यसभा पुन्हा दिवसभरासाठी तहकुब करावी लागली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)