सरकारच्या हलगर्जीपणाची शिक्षा विद्यार्थ्यांना कशाला?

मुंबई – केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) पेपरफुटीनंतर होणाऱ्या फेरपरीक्षेला तुमच्या मुलांना बसवू नका, असे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पालकांना केले आहे. तुम्ही झुकताय हे जर सरकारच्या लक्षात आले, तर ते तुम्हाला आणखीन वाकवायचा प्रयत्न करतील. तुमच्या निर्णयावर तुम्ही ठाम रहा.

सीबीएसईचा पेपर फुटणे हा मुळात सरकारचा हलगर्जीपणा आहे. सरकारने स्वतःची चूक सुधारायची किंवा मान्य करायची सोडून विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा कसल्या द्यायला लावता? सरकारला जर प्रश्नपत्रिकांची गोपनीयता राखता येत नसेल तर विद्यार्थ्यांचा त्यात काय दोष? त्यांनी का पुन्हा त्या विषयांच्या परिक्षेला बसावे? असे अनेक प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केले आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)