नीरा नरसिंहपूर/रेडा (वार्ताहर) – केंद्र व राज्यातील भाजप सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे शेतकरी व सर्वसामान्य उद्‌ध्वस्त झाला आहे. त्यामुळे जनसंघर्ष यात्रेच्या माध्यमातून कॉंग्रेस जनजागृती करणार असल्याचे प्रतिपादन नीरा-भीमाचे संचालक उदयसिंह पाटील यांनी केले. इंदापूरात कॉंग्रेसच्या राज्यव्यापी जनसंघर्ष यात्रेचे बुधवारी (दि. 5) आगम होणार आहे, त्याच्या तयारीसाठी गणेशवाडी, लोणी देवकर येथे नियोजन बैठकीत ते बोलत होते, त्यावेळी पाटील बोलत होते. यावेळी अकलूज कारखान्याचे संचालक महादेव घाडगे, कर्मयोगी शंकरराव पाटील कारखान्याचे संचालक प्रशांत सूर्यवंशी, युवानेते दीपक जाधव, मनोज पाटील, श्रीमंत ढोले, शंकर घोगरे, तुकाराम घोगरे आदि मान्यवर उपस्थित होते. मयूरसिंह पाटील म्हणाले, इंदापूर तालुक्‍यातील जनता हर्षवर्धन पाटील यांच्या पाठीशी भक्कमपणे उभी आहे, हे राज्यातील कॉंग्रेस नेत्यांना दाखविण्यासाठी इंदापूर येथे पाच सप्टेंबरला येणाऱ्या कॉंग्रेसच्या संघर्ष यात्रेत सामील व्हा, असे आवाहन त्यंनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)