सरकारच्या विरोधात राष्ट्रवादीचे मौनव्रत, धरणे आंदोलन

नगर – गांधी जयंतीचे औचित्य साधून राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने सरकारच्या विरोधात मौनव्रत व धरणे आंदोलन करण्यात आले आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या सूचनेनुसार येथील वाडीया पार्क जिल्हा क्रीडा संकूला बाहेरील महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळ धरणे धरूण मौन पाळण्यात आले.
यावेळी आमदार अरुण जगताप, दादाभाऊ कळमकर, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, आमदार संग्राम जगताप, शहरजिल्हाध्यक्ष प्रा. माणिकराव विधाते, कार्याध्यक्ष संदीप वर्पे, अमित खामकर, किसनराव लोटके, संजय सपकाळ, अण्णा दिघे आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते.
केंद्र व राज्य सरकारच्या फसव्या धोरणांमुळे सर्वसामान्य जनतेची आर्थिक,सामाजिक परिस्थिती खालावली आहे. तसेच कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. भाजपच्या प्रतिगामी धोरणांमुळे महात्मा गांधीनी मिळवून दिलेले स्वातंत्र्य, लोकशाही व संवैधानिक सार्वभौमत्व धोक्‍यात आलेले आहे. सरकारच्या चुकीच्या धारेणाविरोधात आंदोलनाच्या माध्यमातून या सर्व गोष्टींचा निषेध करण्यात आला आहे.

 

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)