सरकारच्या विरोधात बोलणाऱ्यांचा आवाज दाबण्यात येतो – खा. सुळे

कोपरगाव – भाजप सरकारच्या विरोधात जो बोलेल त्यांचा आवाज दाबण्याचे काम हे सध्याचे सरकार होत आहे. शेतकऱ्यांसह सामान्य नागरिकांना येथे न्याय मिळत नसल्याची खंत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्‍त केली.
कोपरगाव तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने आयोजित महिला मेळाव्यात त्या बोलत होत्या.अध्यक्षस्थानी प्रियदर्शनी महिला मंडळाच्या अध्यक्ष पुष्पाताई काळे होत्या. यावेळी राष्ट्रवादीचे युवा नेते आशुतोष काळे, जिल्हा बॅंकेच्या संचालिका चैताली काळे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, कार्याध्यक्ष संदीप वर्पे, वैशाली नागवडे, मंजुषा गुंड, कपिल पवार, अमृता कोळपकर, पंचायत समितीच्या सभापती अनुसया होन, जि.प. सदस्य सोनाली रोहमारे उपस्थित होते.
सुळे म्हणाल्या, भाजप सरकारने साडेचार एकही आश्‍वासन पूर्ण केले नाही. सर्व योजनांमध्ये सरकार अपयशी ठरले आहे. दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीहल्ला करून क्रुरता केली आहे. भाजप सरकारचे मुख्यमंत्री निवडणुकीत साम, दाम, दंड, भेद या नितीचा वापर करण्याची भाष वापरतात. यांना सत्तेची मस्ती चढली आहे.म्हणुनच राम कदम सारख्या जबाबदार व्यक्तीने मुलींना पळवुन आणण्याची भाष केली. जर यापुढे कोणी असे महिलांबद्दल बोलले तर गाठ माझ्याशी आहे. या सरकारने शिक्षणामध्ये राजकारण आणले हे राज्याचे दुर्दैव आहे. इंधनाच्या दरात राज्य व केंद्र सरकारने प्रत्येकी अडीच रुपयांची सुट देवुन 5 रुपये दर कमी केल्याबद्दल सरकारच्या निर्णयाचे स्वागत त्यांनी केले.
यावेळी आशुतोष काळे म्हणाले, माजी आमदार अशोक काळे विरोधात असुनही त्यांनी मतदारसंघात जी विकास केला. तशी कोणीच केली नाही. दुसऱ्यांच्या विकासकामांचे फलक लावण्याचे काम येथील लोकप्रतिनिधी करीत आहे.सध्याच्या लोकप्रतिनिधींमुळे तालुका दहावर्षे पाठीमागे गेला आहे.
यावेळी चैताली काळे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, मंजुषा गुंड, संदीप वर्पे आदींची भाषणे झाली. प्रास्ताविक स्वप्नजा वाबळे यांनी केले. या कार्यक्रमास राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष चारूदत्त सिनगर, शहराध्यक्ष सुनिल गंगुले, नवाज कुरेशी, नगरसेविका वर्षा गंगुले, माधवी वाकचौरे, नगरसेवक मंदार पहाडे, विरेन बोरावके, संदीप पगारे आदी उपस्थित होत्या. सुत्रसंचलन राजश्री पिंगळे यांनी केले तर नगरसेविका प्रतिभा शिलेदार यांनी आभार मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)