सरकारच्या विरोधातच हा हल्लाबोल मोर्चा

शेवगाव – कर्जमाफीत किचकट अटी घालून शासनाने शेतकऱ्यांची फसवणूक केली. मराठा, धनगर व मुस्लीम आरक्षणात ठोस भूमिका घेतली नाही. व्यापाऱ्यांनाही जीएसटी प्रणालीमुळे त्रास होत आहे. सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यात सरकार अपयशी ठरले असून सरकारच्या विरोधात आवाज उठविण्यासाठी हल्लाबोल मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. यात शेतकरी, युवक, महिला व नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे, असे आवाहन राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले यांनी केले.

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने हल्लाबोल आंदोलन सुरू असून शेवगाव येथे 15 फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजता आंबेडकर चौकातून मोर्चा काढून हे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाच्या नियोजनाची बैठक शेवगाव येथे बाजार समितीत बुधवारी झाली; यावेळी घुले बोलत होते. यावेळी पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितिज घुले, “ज्ञानेश्वर’चे संचालक काकासाहेब नरवडे, अरुण लांडे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष कल्याण नेमाणे, जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ साळवे, सुरेश दुसुंगे, युवक राष्ट्रवादीचे तालुका कार्याध्यक्ष ताहेर पटेल, कृष्णा पायघन, रामनाथ राजपुरे, पंडित भोसले, अंबादास कळमकर, संजय फडके, बबन भुसारी, संजय शिंदे, भाऊसाहेब चेके, नगरसेवक सागर फडके, एजाझ काझी, मन्सूर फारोकी यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

-Ads-

घुले म्हणाले, “”या हल्लाबोल मोर्चासाठी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया पवार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, महिला आघाडीच्या अध्यक्षा चित्रा वाघ यांच्यासह पक्षाच्या विविध सेलचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. सरकारच्या विरोधात आवाज उठविण्यासाठी या मोर्चाचे आयोजन केले आहे. हा मोर्चा यशस्वी करण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी गणनिहाय दौरा करावा. मध्यंतरीच्या काळात विविध कारणांमुळे कार्यकर्त्यांत मरगळ आल्याचे वातावरण होते. त्यामुळे अनेक जण गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत. परंतु, आपला कार्यक्रम आता सुरू झालेला आहे. मोर्चाच्या पूर्वी पाच हजार युवकांची मोटारसायकल रॅली काढण्यात येणार आहे. हा मोर्चा तहसील कार्यालयावर नेऊन तेथेच त्याचे रूपांतर सभेत होणार आहे.” बाजार समितीचे सभापती संजय कोळगे यांनी प्रास्ताविक केले. तर, आभार कल्याण नेमाणे यांनी मानले.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)