सरकारच्या निषेधार्थ तृतीयपंथीयांच्या हस्ते उभारली काळी गुढी

आज बाजार बंदची हाक, धनगर समाज उपोषणाचा दुसरा दिवस : अनेक संघटनांचा पाठिंबा

राहुरी विद्यापीठ: धनगर समाजाला एस.टी. प्रवर्गात समावेश करून घ्यावा व त्यानंतरच मेगा भरती करावी या मागणीसाठी यशवंत सेना व धनगर समाजाच्या वतीने राहुरी तहसील समोर सोमवार (दि.10) पासून उपोषण सुरू करण्यात आले आहे. उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी अनेक संघटनांनी व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी उपोषणस्थळी भेट देवून उपोषणाला पाठिंबा दिला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी राहुरीचे तहसीलदार अनिल दौंडे, पोलीस निरीक्षक हनुमंतराव गाडे यांनी उपोषणकर्त्यांच्या मागण्या जाणून घेवून उपोषण सोडण्याची विनंती केली. परंतु त्यांची विनंती उपोषणकर्त्यांनी फेटाळून लावत जोपर्यंत सरकार निर्णय घेत नाही, तोपर्यंत उपोषणातून उठणार नाही असा पावित्रा आंदोलनकर्त्यांनी घेतला. यावेळी भाजप सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत तृतीयपंथीयांच्या हस्ते तहसील कार्यालयासमोर काळी गुढी उभारून सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला.

आज राहुरीचा आठवडे बाजार बंदची हाक देण्यात आली आहे. यावेळी शेतकरी व व्यापाऱ्यांनी बंद पाळण्याचे आवाहन उपोषणकर्ते विजय तमनर यांनी केले आहे. तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीतील हमाल बांधवांनी या दिवशी काम न करण्याचीही भूमिका यावेळी व्यक्त केली. यावेळी कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना, आरपीआय, निळवंडे पाटपाणी कृती समिती आदिंनी या उपोषणस्थळी येवून पाठींबा दर्शविला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)