सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा समाजाची काळी दिवाळी : अजित पवार

File photo

हिवाळी अधिवेशनात आवाज उठवणार 

मुंबई: मराठा समाजाला आरक्षण देण्यावरून सरकारकडून होणाऱ्या दिरंगाईवरून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी संताप व्यक्त केला. मराठा समाजाने यावर्षी काळी दिवाळी साजरी केली. भाजपा-शिवसेना सरकारच्या नाकर्तेपणामुळेच मराठा समाजावर काळी दिवाळी साजरी करण्याची वेळ आली, अशी टीका करीत मराठा आरक्षणाच्या मुद्यावर आपण हिवाळी अधिवेशनात आवाज उठवणार असल्याचा इशारा पवार यांनी दिला.

मराठा समाजाला आरक्षण लागू करण्यात यावे, या मागणीसाठी मराठा समाजाने गेल्या 12 दिवसांपासून मुंबईतील आझाद मैदानात बेमुदत आमरण उपोषण सुरु केले आहे. आज अजित पवार यांच्यासह विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेवून त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या. यावेळी आमदार विद्या चव्हाण, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव उपस्थित होते. त्यावेळी अजित पवार पत्रकारांशी बोलत होते.

गेली चार वर्षे या सरकारने मराठा समाजाच्या मागण्या खेळवत ठेवल्या आहेत. गेले 12 दिवस मराठा समाजाचे तरुण आझाद मैदानात उपोषण करत आहेत. पण सरकारने याची साधी दखल सुद्धा घेतली नाही. म्हणूनच हिवाळी अधिवेशन सुरू झाल्यानंतर पहिल्या दिवसापासूनच आम्ही या प्रश्नांसंदर्भात आक्रमक भूमिका घेणार आहोत, अशी स्पष्ट भूमिका पवार यांनी जाहीर केली. शिवाय अजित पवार आणि विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी विनाअनुदानित उच्चमाध्यमिक प्राध्यापकांच्या उपोषणस्थळी भेट दिली. त्यांच्या मागण्यांचे निवेदन स्विकारतानाच त्यांच्या मागण्यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना फोन करुन तत्काळ त्यांच्या समस्या सोडवण्याचे आदेश दिले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)