सरकारच्या धोरणांनी शेतकरी मेटाकुटीला : आ. पिचड

अकोले: अच्छे दिनाचे गाजर दाखविलेल्या सरकारने शेतकऱ्यांच्या अपेक्षा पूर्ण केल्या नाहीत, अशी टीका आ. वैभवराव पिचड यांनी केली. गेल्या चार वर्षांत येथील शेतकरी मेटाकुटीला आला आहे. त्यात दुष्काळी परिस्थितीची भर पडली आहे. त्याचा परिणाम शेतीबरोबरच डांगी जनावरांची पैदास, संगोपन करण्यास विविध अडचणी येत आहेत, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.

राजूर येथे सुरू असलेल्या राज्यस्तरीय डांगी व संकरित जनावरांच्या प्रदर्शनात पारितोषिक वितरण माजी मंत्री मधुकराव पिचड यांच्या अध्यक्षतेखाली झाले. त्यावेळी आ. पिचड बोलत होते. जि. प. कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती अजय फटांगरे, जि. प. बांधकाम विभागाचे सभापती कैलास वाकचौरे, अकोले पंचायत समितीच्या सभापती रंजनाताई मेंगाळ, उपसभापती मारुती मेंगाळ, मधुकरराव नवले, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष गिरजाजी जाधव, माजी सभापती बाळासाहेब देशमुख, शंभू नेहे, अरुण माळवे, संतोष बनसोडे, राजेंद्र कानकाटे, दत्तात्रय भोईर, सरपंच हेमलताताई पिचड, आशाताई पापळ, सारिका वालझाडे, उपसरपंच गोकुळ कानकाटे, माधवराव गभाले, ग्रामविकास अधिकारी बाळासाहेब आंबरे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आ. पिचड म्हणाले, कर्जमाफीत जाचक अटी शेतकऱ्यांनी पूर्ण केल्या. परंतु शेतकरी कर्जमाफीमध्ये बसू शकले नाहीत. चार वर्षांपासून शेतकऱ्यांच्या मालाला कवडीमोल भाव मिळत आहे. त्यामुळे संपूर्ण शेतकरी उद्‌ध्वस्त झाला आहे. अकोले तालुक्‍यात दुष्काळ पडला असून, सरकारने दुष्काळ जाहीर केलेला नाही. परंतु तुमच्या धरणात पाणी असल्याने दुष्काळ जाहीर करता येऊ शकत नाही, असे कारण सरकारकडून सांगण्यात आले.

आदिवासी भागातील जलस्रोत कोरडे पडले आहेत. दुष्काळ अतिशय भयानक असल्याने पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागणार आहे. 16 दिवसांत खासदार झालेल्या सदाशिव लोखंडे यांनी अकोले तालुक्‍याबाबत दुटप्पी धोरण अवलंबू नये. पहिली आपली भूमिका सांगावी. मगच तालुक्‍यात फिरायला सुरुवात करा, असा मौलिक सल्लाही आ. पिचड यांनी यावेळी दिला. यावेळी इगतपुरी तालुक्‍यातील धामणीचे अंकुश गोरख भोसले यांच्या वळूची चॅम्पियन म्हणून निवड करण्यात आली. त्यास पंधरा हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात आले. धामणीच्या रतन भोसले यांचा वळू उपचॅम्पियन ठरला. त्यांना सात हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात आले.


वाघ म्हातारा झाला तरी गवत खात नाही : माजी मंत्री पिचड

अकोले तालुक्‍यातील पाण्यासाठी मी लढत आलो. पाणी वाचवत व तालुक्‍यासाठी पाणी टिकवत आलो. संगमनेर-अकोले तालुक्‍यांना हक्काचं भंडारद-याचं पाणी मिळवून दिलं. म्हणून या माणसाशी लढताना हजार वेळा विचार करा. वाघ म्हातारा झाला म्हणून गवत खात नाही. मधुकर पिचड म्हातारा झाला असेल, तर तो लढायला मागे पडेल, असं कोणी मनात आणू नका, असा सज्जड इशारा माजी मंत्री मधुकराव पिचड यांनी विरोधकांना दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)