सरकारच्या दबावामुळे काश्‍मीरात दहशतवाद्यांची पळापळ- जेटली

नवी दिल्ली – काश्‍मीरातील दहशतवादी संघटना आणि त्यांच्या म्होरक्‍यांवर एनआयए म्हणजेच राष्ट्रीय तपास यंत्रणांमार्फत जी कारवाई करण्यात आली आहे त्यामुळे या दहशतवाद्यांवर आता तेथे मोठा दबाव आला असून त्यांची त्यातून पळापळ सुरू झाली आहे असा दावा केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी केला आहे. ते म्हणाले की या दहशतवादी संघटनांना विदेशातून मिळणाऱ्या आर्थिक मदतीवर नियंत्रण आणण्यात आल्यामुळे त्यांच्यावर बऱ्याच प्रमाणात नियंत्रण आले आहे.

दिल्लीत एका वृत्तवाहिनीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या एका परिषदेत ते बोलत होते. तथापी त्यांनी यावेळी डोकलाम विषयावरून निर्माण झालेल्या पेच प्रसंगाबाबत कोणतेहीं भाष्य करणे टाळले. काश्‍मीरातील स्थितीबाबत बोलताना ते म्हणाले की आज काश्‍मीरातील कोणतीही दहशतवादी संघटना मोठ्या हल्ल्याच्या मानसिकतेत नाहीत. उलट आज त्यांना त्यांच्या जीवाचीच भिती निर्माण झाली आहे. दहशतवाद्यांचा नायनाट करण्यासाठी जम्मू काश्‍मीर पोलिस यंत्रणाही कसोशिचे प्रयत्न करीत आहे याचेहीं त्यांनी यावेळी कौतूक केले.

काश्‍मीर खोरे दहशतवाद्यांपासून मुक्त करण्यासाठी सर्वच सुरक्षा यंत्रणा एकमेकांशी तारतम्य राखून काम करीत आहेत असे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की दहशतवाद्यांच्या विरोधात सुरक्षा पथकांची कारवाई सुरू झाली की स्थानिक नागरीक शेकडोंच्या संख्येत बाहेर येऊन सुरक्षा जवानांवर दगडफेक करीत असत. त्याचा लाभ घेऊन दहशतवादी फरारी होत असत पण आता अशा घटनेच्यावेळी सुरक्षा जवानांवर दगडफेक करणाऱ्यांची संख्या आता 20-30-50 अशी रोडावली आहे असा दावाहीं त्यांनी केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)