सरकारचे शेतकऱ्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष- आ. पिचड

संगमनेर: राज्यात कोणालाही अच्छे दिन आले नाहीत. शेती मालाला भाव मिळत नसल्याचे शेतकरी अडचणीत आला आहे. जगाचा पोशिंदा आपण शेतकऱ्यांना म्हणतो. मात्र तो पोशिंदा अडचणीत आहे. मायबाप सरकारने मात्र चार वर्षांच्या कार्यकाळात शेतकऱ्यांच्या अडचणीकडे लक्ष दिले नाही, असे म्हणत आमदार वैभव पिचड यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली.

संगमनेर तालुक्‍यातील सावरगाव घुले येथे चंपाषष्ठीनिमित्त श्री खंडोबा मंदिर कलशारोहण व मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती अजय फटांगरे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख जनार्दन आहेर, ज्येष्ठ नेते डॉ. भानुदास डेरे, स्वाभिमानी संघटनेचे शरदनाना थोरात, पंचायत समिती सदस्य संतोष शेळके, राष्ट्रवादीचे प्रवक्ते चंद्रकांत घुले, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब ढोले, देवस्थानचे अध्यक्ष सीताराम घुले, सचिव गोरक्ष मदने, अर्जुन घुले, सामाजिक कार्यकर्ते सुरेश गाडेकर, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवा कार्यकर्ते गणेश लेंडे, नानासाहेब मालुंजकर, सुशांत गर्जे, अनिल मोरे, संदीप शेळके आदी उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आमदार पिचड पुढे बोलताना म्हणाले, यापूर्वीही श्री खंडोबा महाराजांच्या मंदिरासाठी अकरा लाख रुपयांचा निधी दिला आहे. ग्रामदैवत ही आपली शक्ती असून, सावरगाव घुले येथील श्री खंडोबा महाराजांचे हे देवस्थान अनेक गावांचे कुलदैवत आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने या देवस्थानचा विकास झाला पाहिजे. या देवस्थानचा ‘क’ वर्गात समाविष्ट करुन पंचवीस लाख रुपयांचा निधी देणार असल्याची घोषणाही यावेळी त्यांनी केली. आ. पिचड म्हणाले, हा निधी येईल तेव्हा येईल. पण सध्या माझ्या आमदार निधीतून दहा लाख रुपयांचा निधी मी लगेच उपलब्ध करुन देतो, असेही त्यांनी सांगितले.

सकाळी श्री खंडोबा महाराजांच्या मूर्तीची मिरवणूक गावातून काढण्यात आली होती. त्याचबरोबर पालखी छबिन्याचीही मिरवणूक काढली होती. मिरवणूक झाल्यानंतर रामानंदगिरीजी महाराज यांच्या हस्ते मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. प्रास्ताविक देवस्थानचे अध्यक्ष सीताराम घुले, सूत्रसंचालन बाबासाहेब कडू, तर शेवटी आभार देवस्थानचे सचिव गोरक्षनाथ मदने यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)