सरकारचे ग्रामीण भागाकडे दुर्लक्ष

संगमनेर – “”केंद्रातील आणि राज्यातील सरकार शहरांविषयी गप्पा करणारे आहे. ग्रामीण भागाकडे त्यांचे पूर्ण दुर्लक्ष आहे. सरकार बदलल्याचे परिणाम आता जनतेला कळत आहेत,” असे प्रतिपादन आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले.

तालुक्‍यातील धांदरफळ बुद्रुक येथे रविवारी नूतन ग्रामपंचायत कार्यालय इमारत, थोरात सभागृह आणि वलवे व्यापारी संकुलाच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार डॉ. सुधीर तांबे होते. माधव कानवडे, जिल्हा बॅंकेचे उपाध्यक्ष रामदास वाघ, रोहिदास डेरे, जिल्हा परिषद कृषी सभापती अजय फटांगरे, पांडुरंग घुले, निशा कोकणे, नवनाथ आरगडे, संपत डोंगरे, साहेबराव कवडे, बाळासाहेब मोरे, बाळासाहेब शिंदे, रमेश गुंजाळ, अवधूत आहेर, सखाराम कोकणे, बाबासाहेब गायकर, सरपंच सिंधू तोरकडी, तहसीलदार प्रियंका आंबेकर, गटविकास अधिकारी सुरेश शिंदे, बाळासाहेब देशमाने, सुरेश खुरपे यावेळी उपस्थित होते.

आ. थोरात म्हणाले, “”धांदरफळ बुद्रुक गावची संगमनेर तालुक्‍याच्या विकासात मोठी साथ राहिली आहे. धांदरफळ सोसायटीची इमारत ही गुलाबराव वलवे यांच्या काळात झाली. धांदरफळ ग्रामपंचायतीची झालेली नवी इमारत अतिशय चांगली झाली आहे. विकास कामांच्या बाजूने राहण्याची धांदरफळ ग्रामस्थांची पध्दत आहे. राज्य सरकारने कर्जमाफी वेगवेगळ्या अटी लावून केल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)