सरकारची कर्जमाफी म्हणजे लबाडा घरचे आवतन- शरद पवार

राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर गडाख

जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीशी फारकत घेवून नव्याने पक्ष स्थापन केलेले माजी खासदार यशवंतराव गडाख आज मेळाव्याच्या निमित्ताने राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर दिसल्याने अनेकांच्या भुवऱ्या उंचावल्या होत्या. अचानक गडाख राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर असे आले हा चर्चेचा विषय ठरला असून शरद पवार यांनी पुन्हा जिल्ह्यात पक्षाची मोट बांधण्यास या निमित्ताने सुरवात केल्याचे दिसून आले

पारेनर – 88 हजार रुपयांची कर्ज मोठमोठ्या उद्योगपतीने बुडविली. त्यामुळे सरकार या बड्या उद्योपतींचे कर्जमाफ करण्याचा प्रयत्न करीत आहे. परंतु शेतकऱ्याचे कर्ज थकविले तर त्याच्या जमिनचा लिलाव करून त्याची इज्जत काढली जात आहे. ही शरमेची बाब आहे. शेतमाला भाव नाही, त्यामुळे शेतकरी उद्धस्त होत असून राज्य सरकारच्या कर्जमाफी योजनेचा पुरता बोजवारा उडाला आहे. त्यामुळे सरकारची कर्जमाफी म्हणजे लबाडा घरचे आवतन असल्याची टिका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज येथे केली.

पारनेर तालुक्‍यात आयोजित केलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मेळाव्यात ते बोलत होते. या मेळाव्या अध्यक्षस्थानी जिल्ह्याचे प्रभारी दिलीप वळसे होते. यावेळी माजी मंत्री मधुकरराव पिचड, माजी खासदार यशवंतराव गडाख, आमदार अरुण जगताप, आमदार वैभव पिचड, आमदार राहुल जगताप, अंकुशराव काकडे, आशुतोष काळे, प्रतापराव ढाकणे, युवक प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते, जि.प.उपाध्यक्षा राजश्री घुले, मंजुषा गुंड माजी आमदार पोपटराव गावडे, जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले, सिताराम गायकर, अविनाश आदिक, माधवराव लामखडे,उपसभापती दिपक पवार, अशोक सावंत, अरूण कडु पाटील आदी उपस्थित होते.

पवार म्हणाले, शेती व शेतीमाला संदर्भात सरकारची नियत चुकीची व गुंतागुतीची आहे. त्यामुळे शेतीमालेला हमीभावासह इतर गोष्टीचा विचार करावा. माझ्यावर खाणाराची काळजी नसल्याचा आरोप होत असतो. परंतु पिकवणारा शेतकरी जगला नाही तर खाणारा जगणार नाही. फडवणीस सरकारचे लबाडाचे आवतण हे खाल्याशिवाय नाही असा आरोप त्यांनी केला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)