सरकारचा रोजगारनिर्मितीवर भर 

चौदा प्रकल्पांत होणार एक लाख कोटींची गुंतवणूक 

नवी दिल्ली: रोजगार निर्मितीचा संकल्प आणि लोकसभेच्या येऊ घातलेल्या निवडणुकीचे ध्येय समोर ठेवून सरकारने रोजगारनिर्मिती करण्याचे ध्येय समोर ठेवले आहे. यासाठी सरकार 1 लाख कोटी रुपये खर्च करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

-Ads-

देशातील वेगवेगळया ठिकाणी 14 मोठे राष्ट्रीय रोजगार क्षेत्रांची (मेगा नॅशनल एम्प्लॉयमेन्ट झोन) निर्मिती केली जाणार असून हा प्रकल्प पुढे तीन वर्षाच्या कालावधीत पूर्ण केला जाणार असून 1 कोटी युवा वर्गाला प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होणार असल्याचे यावेळी म्हटले आहे.

नीती आयोगाची मदत घेत उद्योग मंत्रालयाचे सहकार्य घेत या संपूर्ण योजनेला अंतिम रूप देण्यात येणार असून यात नवीन वेगवेगळया क्षेत्राचा समावेश असणार आहे. पायाभूत सुविधांवर आधारित रोजगारांची संख्या जास्त प्रमाणात आहे. तर नवीन सुविधांचा या रोजगारनिर्मिती क्षेत्रामध्ये समावेश केला जाणार असल्याची नोंद करण्यात आली आहे. कापड, चामडी उद्योग, रत्न, हिरे, जवाहिर या क्षेत्रातील रोजगार सोडून अन्न, अन्न प्रक्रिया, सिमेंट, फर्निचर, इलेक्‍ट्रॉनिक्‍स अशा क्षेत्रातून 35 अन्य मार्गाचा वापर करून रोजगारनिर्मिती केली जाणार असल्याची माहिती सरकारी सूत्राकडून देण्यात आली.

हा प्रकल्प उभा करण्यासाठी राज्याची मदत घेतली जाणार असून यात जमीन खरेदी व नवीन प्रकल्प उभा करण्यासाठी कमीत कमी 2 हजार एकर जमिनीची आवश्‍यकता लाभल्यास ती मदत केंद्र सरकार घेणार असल्याचे म्हटले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)