सरकारचा जमाखर्च योग्य मार्गावर : अरुण जेटली

केंद्र सरकारने चालू आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला जाहीर केलेल्या अर्थसंकल्पाच्या चौकटीतच सरकार खर्च करीत आहे. अपेक्षेइतके कर संकलन होणार असल्यामुळे सरकारने कर्ज कमी घेण्याचे ठरविले आहे. त्यामुळे केंद्र सरकारला रिझर्व्ह बॅंकेकडून अतिरिक्त निधीची गरज नाही, असे सांगूनही या विषयावर माध्यमात चर्चा होत आहे.
-अरुण जेटली, केंद्रीय अर्थमंत्री

नवी दिल्ली: सरकारने अर्थसंकल्पात जाहीर केल्याप्रमाणेच खर्च चालू ठेवला आहे. त्याचबरोबर सरकारला अपेक्षेइतका महसूल मिळत आहे. त्यामुळे सरकारच्या अंदाजपत्रकावर कसलाही परिणाम झालेला नाही. या कारणामुळेच सरकारने ठरविल्यापेक्षा 60 हजार कोटी रुपयांचे कर्ज कमी घेण्याचे ठरविलेले आहे. त्यामुळे चालू आर्थिक वर्षात तूट वाढण्याची शक्‍यता नसल्याचा पुनरुच्चार अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केला आहे.

ते म्हणाले की, केंद्र सरकारने सुरुवातीपासून तूट कमी करून ती 3.3 टक्‍क्‍यांवर आणण्याचे जाहीर केले होते. नोटाबंदी आणि जीएसटीमुळे सरकारच्या महसुलावर काय परिणाम होणार आहे, याचा अंदाज सरकारला आला होता. त्या सर्व बाबीचा विचार करूनच जमाखर्चाचा अंदाज तयार करण्यात आला होता. मात्र, सरकारचा महसूल कमी होईल आणि सरकारचा खर्च वाढेल असा अंदाज विरोधी पक्षाकडून मांडला जात होता. मात्र, तसे काही होणार नाहीं असे जेटली यांनी सांगितले. या वर्षाच्या अखेरीस निवडणुका होणार असतानाही सरकारने अनुत्पादक खर्च वाढू दिला नसल्याचे त्यांनी सांगितले.

-Ads-

त्यांनी सांगितले की, आगामी काळात उत्पन्नत वाढ होण्याची शक्‍यता आहे. त्याचबरोबर जीएसटीतूनही काही महिन्यांत 1 लाख कोटी रुपयांचे उत्पन्न मिळू लागले आहे. त्यामुळे कर संकलनाच्या आघाडीवर सरकारची कामगिरी चांगली आहे. त्याचबरोबर सरकारने अनुत्पादक खर्च कमी केला आहे. त्यामुळे सरकारने कमी कर्ज घेतले असल्याचे त्यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)