सरकारचा आणीबाणी आणण्याचा डाव : अजित पवार

File Photo

कोल्हापूर: घटनात्मक संस्थांच्या कारभारामध्ये सरकारचा हस्तक्षेप वाढला असल्याने त्यांचे अस्तित्व धोक्‍यात आले आहे. मागील दाराने आणीबाणी आणण्याचा सरकारचा डाव सुरू असून तो उधळून लावण्यासाठी युवकांनी एकत्र यावे, असे आवाहन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्यावतीने शनिवारी मार्केट यार्डमधील श्री शाहू सांस्कृतिक मंदिरमध्ये आयोजित युवा एल्गार परिषदेत ते बोलत होते.

अजित पवार म्हणाले, राज्यात कायदा व सुव्यवस्था राहिलेली नाही. महागाई दिवसेंदिवस वाढत आहे. स्मार्ट सिटी, स्मार्ट व्हिलेजच्या घोषणा झाल्या. छत्रपती शिवरायांचे स्मारक, इंदूमिल येथील स्मारक असेल किंवा आरक्षणाचा विषय असेल केवळ घोषणा देण्यापलीकडे भाजप सरकारने काही केले नाही. समाजातील कोणताही घटक समाधानी नाही. युवकांची थट्टा सुरू आहे. नोटाबंदीमुळे भ्रष्टाचार, दहशतवाद किवा नक्षलवाद काहीच कमी झाले नाही. जीएसटीने महागाईत भरच पडली. छोट्या व्यापार्यांना उध्वस्त करण्याचे प्रयत्न सरकार करत आहेत. रेशनवरील धान्य बंद करून ऑनलाईन दारू देणारे सरकार लोकांना देशोधडीला लावण्याचे काम करत आहे, असे ते म्हणाले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सीबीआय, आयबी सारख्या घटनात्मक संस्थांच्या कारभारात सरकारचा हस्तक्षेप वाढला असल्याने या संस्थाचे अस्तित्व धोक्‍यात आले आहे. मनुवादी प्रवृत्ती डोकेवर काढत आहे. त्यामुळे लोकशाही धोक्‍यात आली आहे. लोकशाही वाचविण्यासाठी या सरकारला सत्तेवरून घरी घालविण्याशिवाय पर्याय नाही. ते काम येत्या निवडणुकीत युवकांनी करावे. असे आवाहन अजित पवार यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)