सरकारकडून सहकाराबाबत नकारात्मक दृष्टिकोन : आ. पाटील

उंब्रज – पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र आधुनिक झाला पाहिजे. यासाठी स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांनी सहकाराची मुहूर्तमेढ रोवली. सहकारामुळेच शेतकऱ्यांचे आर्थिक जिवनमान उंचावले. मात्र याच सहकाराकडे सध्याचे सरकार नकारात्मक दृष्टीकोनातून पाहत असून साखर कारखान्यांचे बाबतीत योग्य निर्णय घेण्यास टाळाटाळ करीत आहे. सहकार टिकणेसाठी व टिकवणेसाठी सरकारकडून कसलाच प्रतिसाद मिळत नसल्याचे मत आ. बाळासाहेब पाटील यांनी व्यक्‍त केले.

बेलवडे हवेली, ता. कराड येथे सामाजिक सभागृह, राष्ट्रीय महामार्ग ते बेलवडे हवेली रस्ता डांबरीकरण कामांचे भूमीपूजन तसेच ग्रामपंचायत कार्यालय, रामोशी समाज सामाजिक सभागृह उद्‌घाटन, जि. प. सदस्यांचे फंडातील कामाचे व 14 वित्त आयोगातून पूर्ण केलेल्या कामांचे उद्‌घाटन, स्ट्रीटलाईट कामाचे उद्‌घाटन अशा संयुक्तिक कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने होते. यावेळी माजी उपाध्यक्ष चंद्रकांत जाधव, माजी सभापती देवराज पाटील, जि. प. सदस्य मानसिंगराव जगदाळे, समाजकल्याण सभापती शिवाजीराव सर्वगोड यांची प्रमुख उपस्थिती होती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आ. पाटील म्हणाले, आदरणीय शरद पवारसाहेब यांनी कृषीमंत्री असताना सहकार वाचविण्यास विशेष प्रयत्न केले. मात्र आता तसे प्रयत्न होताना दिसत नाहीत. उलट साखर धंद्याविषयी सध्याचे सरकार बेताल वक्‍तव्य करत आहेत. तुरडाळ, साखर बाहेरुन आयात करुन स्थानिक शेतकारी वाऱ्यावर सोडला आहे. शेतमालाला रास्त हमीभाव नाही. अच्छे दिन च्या नावाखाली तसेच काळा पैसा भारतात आणणार अशा फसव्या घोषणांनी सामान्यांची दिशाभूल केली. त्यामुळे या पुढील काळात सर्वांनी एकसंघपणे शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी कॉंग्रेस बळकट करावी.

सुनिल माने म्हणाले, भाजप सरकारकडून खूप मोठ्या अपेक्षा ठेवल्या. पण त्रासाशिवाय काहीही मिळत नाही. शेतकरी, कामगार, नोकर यापैकी कोणीही सुखी नाही. आदरणीय पवार साहेबांनी साखर धंद्यासाठी निर्यात होण्यास अनुदान उपलब्ध केले. आज दुधाची अवस्था वाईट आहे. यावेळी देवराज पाटील, मानसिंगराव जगदाळे, चंद्रकांत जाधव, शिवाजीराव सर्वगोड यांनी मनोगत व्यक्‍त केले. प्रास्ताविक दाजी पवार यांनी केले. रमेश पाटील यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)