सरकारकडून लोकप्रतिनिधींच्या भावनांचा अनादर- साठे

  • – इंधन दरवाढ विरोधात कॉंग्रेसची सायकल रॅली

पिंपरी, (प्रतिनिधी) – केंद्रातील मोदी सरकार “आरएस्‌एस्‌’चे आदेश मानतात. त्यामुळे जनतेने निवडून दिलेल्या खासदारांच्या भावनांचा अनादर हे सरकार करीत आहे. देशातील सर्वोच्च सदनात अपमानास्पद वागणूक मिळाल्यामुळे खासदार नाना पटोले यांनी राजीनामा दिला. तिच परिस्थिती विधानसभेत आहे. एक वर्षापुर्वी पिंपरी महापालिकेत निवडून आलेल्या नगरसेवकांचीही तिच अवस्था आहे. सत्ताधारी असतानाही त्यांना अनधिकृत फ्लेक्‍स विरोधात मनपासमोर आंदोलन करावे लागते आणि त्यांचीच सत्ता असतानाही प्रशासन नगरसेवका विरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करतात. हा जनतेच्या भावनांचा अनादर करण्याचा प्रकार आहे, अशी टीका पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी केली.

केंद्र व राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे महाराष्ट्रात पेट्रोलचा प्रती लिटर दर 80 रुपयांहून जास्त झाला आहे. घरगुती गॅसची भाववाढ दरमहा सुरुच आहे. याच्या निषेधार्थ पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष सचिन साठे यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी (दि. 30 जानेवारी) निगडीतील भक्ती शक्ती चौकातून पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकापर्यंत सायकल रॅली काढण्यात आली.

-Ads-

डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात रॅलीच्या समारोप प्रसंगी साठे बोलत होते. यावेळी सेवादलाचे शहराध्यक्ष संग्राम तावडे, महाराष्ट्र प्रदेश महिला कॉंग्रेसच्या माजी अध्यक्षा शामला सोनवणे, महिला शहराध्यक्षा गिरीजा कुदळे, ज्येष्ठ नेते सुदाम ढोरे, अल्पसंख्यांक सेलचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्रसिंह वालिया, अल्पसंख्यांक सेलचे शहराध्यक्ष शहाबुद्दीन शेख, ऍड. क्षितीज गायकवाड, चिंचवड ब्लॉक अध्यक्ष परशुराम गुंजाळ, पिंपरी ब्लॉक अध्यक्ष बाळासाहेब साळुंखे, युवक अध्यक्ष नरेंद्र बनसोडे, चिंचवड युवा अध्यक्ष मयूर जैयस्वाल, एन्‌एसयुआयचे शहराध्यक्ष विशाल कसबे, उमेश खंदारे, ज्येष्ठ नागरीक सेलचे अध्यक्ष लक्ष्मण रुपनर, दिलीप पांढरकर, शशीकांत कांबळे, बाबा बनसोडे, कुंदन कसबे, अर्जुन खंडागळे, भास्कर नारखेडे, सद्दाम सय्यद, बाळू चव्हाण, मच्छिद्र सोनवणे, हिरामण खवळे, दिपक जाधव, वसीम इनामदार, मकर यादव, गौरव चौधरी, संकेत बो-हाडे, सिध्दार्थ वानखेडे, संगिता कळसकर, किशोर कळसकर आदी उपस्थित होते.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)