सय्यद अली शाह गिलानीचा मुलगा सरकारी साक्षीदार

दहशतवाद्यांना अर्थसहाय्य प्रकरणी “एनआयए’कडून न्यायालयात यादी सादर

नवी दिल्ली – जम्मू काश्‍मीरमधील विभाजनवादी नेते सय्यद अली शाह गिलानींचे पुत्र आणि प्रसिद्ध उद्योगपती झहूर अहमद वताली यांच्या मुलाला राष्ट्रीय तपास संस्था “एनआयए’ने सरकारी साक्षीदार केले आहे. दहशतवाद्यांना होणाऱ्या अर्थसहाय्याप्रकरणी “एनआयए’ने विशेष न्यायालयाला सादर केलेल्या सरकारी साक्षीदारांच्या यादीमध्ये गिलानी यांचे पुत्र नईम उल जफर आणि वताली यांचे पुत्र यासिर गफर या दोघांच्या नावांचाही समावेश करण्यात आला आहे. “एनआयए’ने यावर्षी जानेवारीमध्ये दाखल केलेल्या आरोपपत्रामध्ये सरकारी साक्षीदारांची यादी देण्यात आली आहे. गफर आणि जफर या दोघांनी तपासादरम्यान दिलेले निवेदनही “एनआयए’ने न्यायालयात सादर केले आहे.

लष्कर ए तोयबाचा म्होरक्‍या हाफिज सईद आणि हिज्बुल मुजाहिदीनचा म्होरक्‍या सय्यद सलाहुद्दीन या दोघांसह 12 जणांवर “एनआयए’ने आरोपपत्र दाखल केले आहे. “एनआयए’ने 10 जणांना अटकही केली असून यामध्ये गिलानींचा जावई अल्ताफ अहमद शाह आणि वताली यांचाही समावेश आहे.

गिलानींचा मुलगा नईम उल जफर तो दुबई, लंडन आणि नंतर पाकिस्तानला पळून गेला होता. तेथे याला बंडखोरीला विरोध करणाऱ्यांकडून धमकावण्यात आल्यानंतर तो “एनआयए’समोर हजर झाला होता. त्याने दहशतवाद्यांशी संबंधित व्यक्‍तींची माहितीही “एनआयए’ला दिली आहे. त्याच प्रमाणे वताली यांच्या मुलानेही आपल्या वडिलांच्या देशविरोधी उद्योगांबाबत “एनआयए’ला माहिती दिली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)