सयाजीराव शाळेचे मुख्य गेट बंद ठेवण्याची सूचना

सातारा : वाहतूक शाखेसमोरील भीमाबाई आंबेडकर शाळेच्या मुख्य गेट मधून महाराजा सयाजीराव शाळेच्या विद्यार्थ्यांनी ये जा करावी. (छाया : गुरुनाथ जाधव)

वाहतूक शाखेसमोरील गेटने प्रवेश
सातारा, दि. 23 (प्रतिनिधी)- बिद्यार्थ्याच्या सुरक्षिततेसाठी महाराजा सयाजीराव हायस्कुल समोरील मुख्य गेट बंद ठेवण्याची सूचना दिल्याची माहिती सातारा वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश घाटगे यांनी दिली. पोवई नाक्‍यावरील ग्रेड सेप्रेटरच्या कामामुळे महाराजा सयाजीराव शाळेत मुलांना येणं जाण अवघड होणार आहे. आता मुलांनी शाळेत जायचे कसे या समस्येची सोडवणूक करण्यासाठी सातारा वाहतूक शाखेच्या समोरील गेटने मुलांनी शाळेत ये-जा करावी अशी सूचना वाहतूक शाखेच्यावतीने शाळा प्रशासनाला देण्यात आली आहे.
सोमवारपासून शाळा सुरु होतील. त्या निमित्ताने पोवई नाक्‍याच्या बाजूने येणाऱ्या रिक्षा, अथवा दुचाकी तसेच चारचाकी वाहनांनी सायली हॉटेल येथे थांबून चालत एका बाजूने जावे लागणार आहे. तर या ठिकाणी वाहतूक एका बाजूने सूरु ठेवली असल्याने अपघात घडण्याची दाट शक्‍यता असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी हा पर्याय अवलंबणे आवश्‍यक असल्याचे घाडगे यांनी सांगितले. जे विद्यार्थी नगरपरिषदेच्या मार्गे अथवा मोती चौक शाहु नगर मार्गे रिक्षाद्वारे येणार आहेत. त्यांनी आपल्या रिक्षा या वाहतूक शाखेच्या समोरील भीमाबाई आंबेडकर शाळेकडे लावून जाणे आवश्‍यक आहे. प्रामुख्याने शाळा सुटल्यानंतर महाराजा सयाजीराव शाळे समोर नित्यच वाहतुकीची कोंडी होत असे. शाळा भरताना व सूटताना या ठिकाणी कायमच वाहतूक शाखेला विद्यार्थ्यची सुरक्षा म्हणून वाहतुकीचे नियंत्रण करावे लागत असे. आता या ठिकाणी ग्रेड सेप्रेटरचे काम सुरु असल्याने महाराजा हायस्कुल, तसेच रयत शिक्षण संस्था मुख्य कार्यलयाकडे जाण्यासाठी अडचण होत आहे. यामध्ये प्रामुख्याने शालेय विद्यार्थ्याची सुरक्षितता लक्षात घेऊन हा निर्णय घेतला आहे. भीमाबाई आंबेडकर या शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारातून विद्यार्थ्यांनी तसेच रिक्षा नि ये-जा केल्यास ते अधिक सुरक्षित ठरेल. महाराजा सयाजीराव शाळेचे मुख्य गेट बंद राहिल्यास विद्यार्थ्यांची सुरक्षितता राहील. व वाहतूक होत असताना व शाळा सुटताना होणारी गैरसोय टळेल. या करिता पालकांनी देखील सहकार्य करावे असे देखील सपोनि घाडगे यांनी आवाहन केले आहे. रिक्षा तसेच अन्य वाहने गेटकडे लावण्याच्या सूचना करताना या ठिकाणी वाहनांची गर्दी नियोजन करणे शाळा प्रशासनाला आवश्‍यक आहे.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)