सयाजीराजे पार्कमध्ये चक्रवाक पाहुण्याचे आगमन

मनमोहक ऱंगसंगतीची ही बदके मूळची हिमालयातील मानससरोवर परिसरातील

अकलूज- मंगोलिया, लडाख, नेपाळ आणि हिमालयातील मानस सरोवर परिसरात वास्त्यव्याला असणाऱ्या चक्रवाक बदकांचा एक थवा येथील सयाजीराजे पार्कमध्ये स्थलांतर करून आला आहे.
टाडोर्ना फेरूगिनिया असे शास्त्रीय नाव असलेल्या या बदकांना इंग्रजीत रूडी शेल्डक, ब्राह्मणी डक या नावाने, तर ब्राह्मणी बदक, चकवा, चकवी, चक्रवाक अथवा सोनेरी बदक या नावाने ओळखतात. भगव्या किंवा बदामी रंगाचा सोनेरी पिसारा, केतकी रंगाचे डोके आणि मान व काळी शेपटी आहे, ही बदके नेहमीच्या बदकांपेक्षा आकाराने मोठी आहेत. नेहमी जोडी करून वावरणाऱ्या नर व मादी बदकांमध्ये फारसा फरक आढळत नाही मात्र नराच्या गळ्यात गोफासारखी काळी पट्टी असते. पाणवनस्पतीची कोवळी पाने, कोंब, खोड आणि बियांसह गोगलगायी, शिंपल्यातील मृदुकाय प्राणी खाण्यात ही बदके व्यस्त असतात. जलकीटक, मासे, बेडकांच्या पिल्लांसह चिखलातील कृमी कीटकसुद्धा या बदकांचे प्रमुख खाद्य आहे. प्रणयक्रीडेत तरबेज पक्षी म्हणून या बदकांकडे पाहले जाते. या बदकांमध्ये एकदा जमलेली जोडी जीवनभर एकनिष्ठेने निभावली जाते. जोडीतील एखाद्याचं मृत्यू झाला तर दुसरा पण विरहाने मृत्यू पत्करतो अशी अख्यायिका आहे. ही बदके आपल्या पिल्लावळांसह भारत भ्रमंतीला येतात आणि देशभर विखुरले जातात.

  • या वर्षी राज्यातील सर्वच पाणवठ्यावर विविध प्रकारच्या स्थलांतरित पक्ष्यांनी अभूतपूर्व गर्दी केली आहे, त्याच प्रमाणे नीरा नदीच्या काठावर साकारलेल्या सयाजीराजे पार्कमधील मानवनिर्मित पाणवठ्यावर पहिल्यांदाच चक्रवाक बदके आली आहेत. एकेकाळी अकलूजजवळच्या नीरा नदीच्या पात्रात गर्दी करणाऱ्या बदकांनी नीरा नदी प्रदूषणाच्या विळख्यात अडकल्यामुळे गेली दोन दशके उकडे पाठ फिरवली होती. आता त्यांच्या पुनरागमनामुळे पक्षीप्रेमींमध्ये उत्साह संचारला आहे.
    – डॉ, अरविंद कुंभार, रत्नशंकर निसर्ग मंडळ, अकलूज
  • पार्क निर्मितीनंतर प्रथमच हे पाहुणे पक्षी याठिकाणी आल्याची माहिती स्थानिक पक्षी अभ्यासकांकडून मिळाली आहे. या परदेशी पाहुण्यांच्या आनंददायी वास्तव्यासाठी पार्क व्यवस्थापन कटीबद्ध आहे.
    – स्वरूपराणी मोहिते-पाटील, व्यवस्थापिका, सयाजीराजे पार्क
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)