“समृद्धी’त गुंतवणूकीस मलेशिया उत्सूक

एकनाथ शिंदे यांची मलेशियन शिष्टमंडळाशी चर्चा

मुंबई – नागपूर आणि ठाणे जिल्ह्यात थेट जमीन खरेदीला सुरुवात झाल्यामुळे आता परदेशातील कंपन्या नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग तसेच राज्यातील इतर पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी स्वत:हून पुढे येवू लागले आहेत. मलेशियाच्या शिष्टमंडळाने सोमवारी सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन प्रकल्पातील सहभागाविषयी चर्चा करुन गुंतवणूकीची इच्छा व्यक्त केली.

मलेशियन शिष्टमंडळ सद्या भारत दौ-यावर आहेत. महाराष्ट्राचा महत्वकांशी प्रकल्प असलेल्या नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासंदर्भात त्यांनी मंत्री एकनाथ शिंदे यांची मंत्रालयात भेट घेतली. या भेटीदरम्यान अनेक बाबींवर सकारात्मक चर्चा झाली असून परस्पर सहकार्य करण्याचे आश्वासन देण्यात आले. भारत-मलेशियाचे मैत्रीपूर्ण संबंध फार जुने असून ते भविष्यात देखील असेच राहतील, असा विश्वास याप्रसंगी व्यक्त करण्यात आला.

मलेशियन सरकारतर्फे उत्तर आणि दक्षिण मलेशिया जोडणारा 773 किमी जोडणारा महामार्ग 1970 साली उभारण्यात आला आहे; तसेच, पूर्व-पश्‍चिम जोडणारा 1000 किमीचा महामार्ग उभारण्याचे काम लवकरच हाती घेण्यात येणार आहे, या प्रकल्पांचा अभ्यास करण्याकरता मलेशियाला भेट देण्याचे शिष्टमंडळ प्रतिनिधींनी दिलेले निमंत्रण शिंदे यांनी यावेळी स्वीकारले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)