समृद्धिच्या उपचारासाठी वकील सरसावले

राजगुरूनगर- गंभीर आजाराने पीडित असलेल्या समृद्धी मच्छिंद्र पवार हिच्या उपचारासाठी राजगुरुनगर बार असोसिएशनच्या वतीने 61 हजार रुपयांची मदत करण्यात आली.
राजगुरुनगर बार असोसिएशनचे सभासद ऍड. मच्छिंद्र पवार यांचे नुकतेच निधन झाले होते, त्यांची 9 वर्षांची मुलगी समृद्धी हिला अचानक निमोनिया हा आजार होता. तिच्यावर चाकण येथील चाकण क्रिटीकल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. मात्र उपचारासाठी सुमारे दोन लाख रुपये खर्च डॉक्‍टरांनी सांगितला होता. आजारी मुलीच्या आईकडे इतके पैसे नसल्याने तिच्यावर उपचार करणे अवघड झाले होते. समृद्धीच्या आईने खेड बार असोसिएशनकडे समृद्धीच्या उपचारासाठी पैशाची अडचण निर्माण झाल्याचे कळवले होते. त्यानुसार बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. दिलीप करंडे, उपाध्यक्ष ऍड. वैभव कर्वे यांनी न्यायालयातील वकिलांची बैठक घेवून मदतीचे आवाहन केले, त्यानुसार सभासदांनी 61 हजार रुपये जमा केले. ही रक्कम चाकण क्रिटीकल हॉस्पिटलमध्ये जमा केली आहे. समृद्धीची तब्बेत सुधारली आहे मात्र, दवाखान्याची फी भरण्यासाठी समृद्धी पवार हिला अजूनही मदतीची गरज आहे.ज्यांना मदत करायची आहे त्यांनी खेड तालुका बार असोसिएशनशी संपर्क साधण्याचे आवाहन बारचे अध्यक्ष ऍड. दिलीप करंडे, उपाध्यक्ष ऍड. वैभव कर्वे यांनी केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)