समुपदेशनामुळे मतभेद मिटवून दाम्पत्य आले एकत्र

– कौटुंबीक न्यायालयाचा सल्ला दोघांनीही ऐकला

पुणे  – मतभेद अगदी टोकाला गेल्यानंतर पोटच्या मुलीचे भविष्य पाहता समुपदेशनानंतर दोघांनी पुन्हा एकत्र येण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे संसाराचे विखुरलेले धागे पुन्हा जुळून मोडणारा संसार पुन्हा सुरू झाला आहे.
समुपदेशनामुळे पती माधव आणि पत्नी माधवी (नावे बदलली आहेत) या दाम्पत्याची संसाराची गाडी पुन्हा रूळावर आली आहे. दरम्यान, माधवीच्या आई-वडिलांनी यापूर्वी केलेल्या तक्रारी मागे घेतल्या.

दोघे 24 जानेवारी 2013 रोजी विवाहबद्ध झाले. तो जेऊर येथील, तर ती इंदारपूरची. सासरी नांदत असताना काही कारणामुळे दोघांमध्ये मतभेद निर्माण होऊ लागले. यामुळे त्यांचे किरकोळ कारणावरून खटके उडू लागले. घरच्यांच्या अतिहस्तक्षेपामुळेही वादामध्ये आणखी भर पडत गेली. यामुळे विवाहितेच्या वडिलांनी 2016 मध्ये सासरच्या लोकांविरुद्ध हुंड्यासाठी मुलीचा छळ होत असल्याची तक्रार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यामुळे प्रकरण आणखी चिघळल्याने हा वाद घटस्फोटावर येऊन पोहोचला. परंतु, जेव्हा हा वाद कौटुंबीक न्यायालयात आल्यानंतर ऍड.

झाकीर मणियार यांच्या मार्गदर्शनानंतर पती-पत्नीचे व्यवस्थित समुपदेशन करण्यात आले. त्यातून गैरसमज दूर केले गेले. त्यानंतर कौटुंबीक न्यायालयाच्या न्यायाधीश फलक इनामदार यांनी दोघांशी पुन्हा संवाद साधून पीडित मुलीचे भवित्याचा विचार करून त्यांना एकत्र येण्याचा सल्ला दिला. न्यायाधीशांनी केलेल्या मार्गदर्शनानंतर दोघांनी पुन्हा एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
1 :cry:
1 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)