समुपदेशनाद्वारे विधी सेवा प्राधिकरणाने केली सहा महिन्यात 762 दावात तडजोड

समुपदेशनामुळे वेळ, पैशाची बचत होते. मानसिक त्रास कमी होतो

विजयकुमार कुलकर्णी
पुणे – वैवाहिक आणि कौटुंबिक कलह सोडविण्यासाठी समुपदेशन महत्त्वाची भूमिका बजावत आहे. शिवाजीनगर येथील सत्र न्यायालयातील पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने समुपदेशनाच्या माध्यमातून मध्यम मार्ग काढत यावर्षी जून अखेरपर्यंत तब्बल 762 दाव्यात तडजोड केली आहे. 762 कुटुंबे जोडली आहेत, अशी माहिती पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव प्रदीप अष्टुरकर यांनी दिली.
आयटी क्षेत्राच्या वाढीबरोबर कलह आणि इगो प्रोब्लेममुळे न्यायालयात किरकोळ कारणावरून दाखल होणाऱ्या प्रकरणांची संख्या वाढली आहे. जागतिककरणामुळे लोकांकडे पैसा आला आहे. संवादाची प्रगत साधनेही आली आहेत. तरीही दुर्दैवाने लोकातील संवाद हरवत चालला आहे. अलीकडच्या काळात पती-पत्नी दोघेही नोकरी करत असतात. त्यामुळे त्यांच्यातील अगदी किरकोळ वाद थेट न्यायालयात पोहोचतात. पत्नीने स्वयंपाक करण्यास नकार देणे अथवा छोट्याशा कारणाने त्यांच्यात झालेला गैरसमज थेट घटस्फोटापर्यंत पोहोचतो. तर आई-मुले, भाऊ-भाऊ यांच्यातील वादही आज न्यायालयात पोहोचू लागले आहेत.अगदी किरकोळ-किरकोळ कारणावरून सख्ख्या भावांमध्ये 10 ते 20 वर्षे संवाद होत नसल्याचे अनेक प्रकार विविध खटल्यातून दिसून आले आहेत. तर अलीकडच्या काळात अनेकांना एकच अपत्य असते. असे पालक मुलांच्या संसारात ढवळाढवळ करतात. त्यामुळे मुलांचा संसारातील वाद विकोपाला जातात. शेजारी राहणाऱ्या व्यक्तीमध्ये किरकोळ कारणावरून मारहाण होण्याच्या घटना घडत असतात. या आणि अशा सर्व प्रकारच्या न्यायालयात दाखल होणाऱ्या खटल्यांचे प्रमाण खूप मोठे आहे. अशा खटल्यात समुपदेशन महत्त्वाचे ठरत आहे. समुपदेशनामुळे छोटे-छोटे गैरसमज दुर होण्यास मदत होत आहे. आता तर काही न्यायालयात समुपदेशनही ऑनलाईन होऊ लागले आहे. विधी सेवा प्राधिकरणाने समुपदेशानाद्वारे केलेल्या तडजोडीमुळे वादी आणि प्रतिवादी दोन्हीही पक्षकार खुष होतात. त्यांच्यात कायमचा संवाद निर्माण होता. आनंदाने घरी जातात. असेही विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने सांगण्यात आले.

किरकोळ गैरसमजामुळे अनेक खटले दाखल होतात. असे खटले वर्षानुवर्षे चालतात. मात्र, समुपदेशात हे गैरसमज दुर होतात. विशेष म्हणजे समुपदेशनानंतर दोन्हीही पार्टी आनंदी असतात. समाधानाने घरी जातात. त्यांचा वेळ, पैसा वाचत असून, प्रकरणे लवकर निकाली निघण्यात मदत होत आहे. होणारा मानसिक त्रास कमी होतो.
       -ऍड. भूपेंद्र गोसावी, उपाध्यक्ष, पुणे जिल्हा बार असोसिएशन.

-Ads-

 

What is your reaction?
4 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)