पती-पत्नीतील वाद ; समुपदेशनानंतर घटस्फोट

पुणे- दोघेही उच्चशिक्षित…विवाह संस्थेमार्फत दोघांची ओळख झाली…त्यातून दोघांचे लग्न झाले… काही दिवस संसार सुरळीत केला…त्यानंतर दोघात वाद निर्माण झाला…हा वाद न्यायालयात गेला…वय कमी असल्याचे समुपदेशनात दोघांच्या लक्षात आणून देण्यात आले… भवितव्याचा विचार करत परस्पर संमतीने घटस्फोट घेत दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला.

माधव आणि माधवी (नावे बदलली आहेत) अशी त्या दोघांची नावे आहेत. माधवचे वय 25 आहे. तर माधवी 23 वर्षाची आहे. माधव ऑर्बियन ट्रेनर आहे. माधवी नोकरी करते. विवाहसंस्थेमार्फत दोघांचे लग्न जुळले. लग्न झाले. दोघांना आई, वडील, भाऊ आणि बहीण असा परिवार आहे. अवघा काही दिवस संसार केल्यानंतर दोघात वाद विकोपाला गेले. त्यामुळे माधव शरीर संबंध करण्यात असमर्थ असल्याचे, कारण देत माधवीने कौटुंबिक हिंसाचार कायद्यानुसार न्यायालयात दावा दाखल केला. तर अवमान झाल्याने माधव यानेही ऍड. सुचित मुंदडा आणि ऍड. सुनीता राजे यांच्यामार्फत न्यायालयात दावा दाखल केला.

न्यायालयाने दोघे, त्यांच्या कुटुंबियांविरोधात समन्स बजावले. दोघे, त्यांच्या कुटुंबीयांना न्यायालयात हजर राहण्यास सांगितले. त्यानुसार दोन्हीकडील पक्षकार न्यायालयात हजर राहू लागले. न्यायमूर्ती नूतन सराफ आणि माया देशमुख यांनी हा वाद लवकर मिटावा, यासाठी पक्षकारांना विशेष वेळ दिला. तर ऍड. मुंदडा आणि ऍड. राजे यांनी दोघांचे वय लहान आहे. संपूर्ण अयुष्य पडले आहे. प्रकरण वेळेत मिटविणे योग्य राहिल, असा योग्य सल्ला दिला. त्यानंतर न्यायमूर्ती नूतन सराफ, माया देशमुख आणि कौटुंबिक न्यायालयातील न्यायाधीश प्रसाद फणसिंगनकर यांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे दोन्ही पक्षकारांनी परस्पर दाखल केलेल्या फौजदारी तक्रारी मागे घेतल्या. परस्पर संमतीने घटस्फोट घेतला. माधवीला एक मोठी रक्कम देण्यात आली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)