व्हॅटिकन सिटी – समुद्रामध्ये मोठ्या प्रमाणावर जमा होणाऱ्या प्लॅस्टिकबाबत ख्रिश्‍चन धर्मियांचे धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांनी चिंता व्यक्‍त केली आहे. जगभरातील सागरीसृष्टीला अशा प्रकारच्या प्रदुषणापासून रोखण्यासाठी कोणत्याही ठोस उपाय योजना केल्या जात नसल्याबद्दलही पोप यांनी तीव्र नापसंती व्यक्‍त केली आहे. पोपच्या विशेषाधिकारातून पोप यांनी पर्यावरणाशी संबंधित जगभरातील ख्रिश्‍चनांना आणि इतरांना हा संदेश दिला आहे. परमेश्‍वराची अप्रतिम भेट असलेला सागर आणि त्यातील घटकांचे संवर्धन करण्याचे आवाहन त्यांनी सर्वांना केले आहे.

“दुर्दैवाने अनेक प्रयत्नांमध्ये प्रभावी परिणामकारकतेचा अभाव दिसून येतो. सागरीसृष्टीच्या संवर्धनासाठी देशाच्या मर्यादांच्या बाहेरच्या नियंत्रणाचाही अभाव अशा प्रयत्नांमध्ये दिसून येतो. आपल्या सागर आणि महासागरांना तरंगणाऱ्या प्लॅस्टिकने भरून टाकू शकणार नाही. यामुळे उद्‌भवलेल्या आणीबाणीचा सामना करण्यासाठी आपली कटिबद्धताच आवश्‍यक आहे, असे पोप यांनी म्हटले आहे.

समुद्राच्या पाण्याचे खासगीकरण अमान्य असल्याचे सांगून समुद्राच्या पाण्यावर मानवाचा हक्क असल्याचेही ते म्हणाले. इटली ते ऑस्ट्रेलियापर्यंतच्या देशांमध्ये निर्वासित सागरीमार्गानेच जात आहेत. समुद्र हे मानवाला वेगळे करत नाहीत. तर मानवी समुदायांमधील भेदच मानवाला एकमेकांपासून दूर करत असल्याचे पोप यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)