समुद्राची वाढती पातळी

मेघश्री दळवी 

ग्लोबल वॉर्मिंगमुळे समुद्राच्या पाण्याची पातळी वाढते आहे, हे सत्य आता सर्वांनी स्वीकारलं आहे. या वाढीमुळे अनेक बेटं आणि किनाऱ्यातलगतच्या शहरांना मोठा धोका आहे, हेही सिद्ध झालं आहे. मियामी, ऍमस्टरडॅम, मुंबई ही शहरं या शतकाच्या अखेरीस किंवा आधीच पाण्याखाली जाऊ शकतील, याची भीती आता जनमानसात रूजली आहे.

पण आपण माणसं कधी हार नाही मानत. ग्लोबल वॉर्मिंगचे परिणाम कमी करण्याचे प्रयत्न नव्याने होऊ लागले आहेत. हरित ऊर्जा (सौर, पवन व अपारंपरिक ऊर्जा) यांचं प्रमाण वाढू लागलं आहे. कार्बन फूटप्रिंट कमी करण्याचे प्रयत्न अनेक देश करत आहेत. तेव्हा शहरं पाण्याखाली जाण्याचा धोका थोडा पुढे जाऊ शकतो.
शास्त्रज्ञ आणखी वेगळ्या बाजूनेही विचार करत आहेत. जिओ इंजिनिअरिंग करून म्हणजे भौगोलिक प्रदेशावर वेगवेगळे तांत्रिक आणि अभियांत्रिकी प्रयोग करून हवामानावर योग्य परिणाम घडवून आणायचे प्रयत्न सुरू झाले आहेत. यात मुख्य भर आहे तो हिमनद्यांचं वितळणं रोखण्यावर.

हिमनद्या (ग्लेशियर्स) म्हणजे एक प्रकारच्या गोठलेल्या नद्या; काही वेळा समुद्रावर तरंगणाऱ्या बर्फाच्या प्रचंड लाद्या. अनेकदा हिमनगांचे (आइसबर्ग) कडे तुटतात आणि तेही असे तरंगू लागतात. हिमनद्या या हिमनगाप्रमाणे एका जागी स्थिर नसतात, तर हळूहळू सरकत असतात. हिमनगांमध्ये कित्येक शतकं थरावर थर रचत गेलेला घट्ट बर्फ असतो आणि तो सहसा वितळत नाही. वितळतात त्या हिमनद्या. कारण त्यांच्यातला बर्फ हा ताजा आणि बराचसा भुसभुशीत असतो.

मुख्यत: उत्तरेला ग्रीनलॅंड, आइसलॅंड, कॅनडा, अलास्का आणि आर्क्‍टिक प्रदेशात, तर दक्षिणेला चिली आणि अंटार्क्‍टिकामध्ये प्रचंड हिमनद्या आहेत. त्यांच्यातला बर्फाचा साठा अवाढव्य आहे आणि सरासरी तापमानात एक अंश सेल्सियसने वाढ झाली तरी त्यातला कितीतरी बर्फ वितळू शकतो. यावर उपाय म्हणून ग्रीनलॅंड आणि अंटार्क्‍टिकामध्ये जिओ इंजिनिअरिंगचे प्रयोग करण्याची कल्पना आता पुढे आली आहे. हिमनगांवर थंडगार पाणी टाकून त्यांचं तापमान कमी करणं, हा एक प्रकल्प त्यात आहे. त्यामुळे त्यांचे तुकडे पडणार नाहीत. त्यासाठी हिमनगांचे पृष्ठभाग झाकण्याच्या पर्यायाचाही विचार सुरू आहे. तसेच हिमनद्या पाण्याला जिथे स्पर्श करतात, तिथलं पाणी उपसून हिमनद्यांचा तळ सतत थंडगार ठेवण्याचा एक प्रस्ताव आहे. त्यामुळे वितळण्याला अडथळा येईल. तर हिमनद्यांच्या प्रवासाला अटकाव करण्यासाठी कृत्रिम बांधकाम करावं हीदेखील एक कल्पना आहे.

या अवास्तव वाटणाऱ्या कल्पना भयंकर खर्चिकसुद्धा आहेत. पण या प्रकारचे उपाय केले नाहीत, तर अनेक शहरांना समुद्राच्या वाढत्या पातळीपासून कसे वाचवायचे, हा प्रश्‍न उरतोच. समुद्राकाठच्या खराखुरा धोका आहे तो हिमनद्या वितळण्यापासूनच. तेव्हा त्या नुकसानाकडे लक्ष देऊन उलट आधीच प्रतिबंधात्मक उपायांवर खर्च करणे योग्य असेल, असं शास्त्रज्ञ सुचवत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
2 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

1 COMMENT

  1. वरील वृत्त वाचण्यात आले समुद्राच्या पाण्याची पातळी वाढते आहे ह्या साठी दिलेली कारणे सपशेल चुकीची आहेत व त्यावरील सुचविलेले उपाय हे कोणा कोणा च्या खोपडीतून प्रसवलेत ? ह्याचा तपशील प्रकाशित होणे गरजेचे वाटते आपल्याकडील शास्त्रज्ञ हे बहुतांशी उचलेगिरीत माहीर आहेत कारण प्रत्येक बाबतीत स्वतः प्रयोग करून त्यांचे विचार ठरत नसतात म्हणूनच स्वातीनंतर प्राप्ती नंतर एकही माहीचालाल नोबेल पारितोषिक मिळविणारा निपजला नाही आता वातावरणातील बदलामुळे तेही आधुनिक विज्ञानाचा चुकीचा वापर हे एक महत्वाचे कारण मान्यच करावे लागेल समुद्राच्या पाण्याची पातळी वाढते हे वरवर दिसणारे कारण जरी असले तरी त्यात तथ्य नाही आपल्या संतशात्रज्ञानी ह्याची कारण मीमांसा सांगताना पृथ्वी हि कलाकलाने पाण्यात डुबत आहे त्यासाठी प्रथम ३ /४ पाण्यात १/४ पृथिवी रुपी दगड कोणत्या कारणाने तरंगत आहे ह्याचा शोध होणे महत्वाचे ठरते पृथ्वीच्या ह्या तरंगण्यासाठी कोणते महत्वाचे घटक कारणीभूत ठरतात त्याचा अभ्यास होणे गरजेचे ठरते ह्या घटकांमध्ये कमीअधिक फरक होत गेल्याने पृथ्वी पाण्यात डुबण्याची शक्यता नाकारता येईल का ? तसे असेल तर समुद्राच्या पाण्याची पातळी वाढली हे दिसत असले तरी त्यात काडीचेही तथ्य नाही हे नाईलाजाने नमूद करणे भाग आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)