मुंबई : मनी लॉन्डरिंग प्रकरणी अटकेत असलेले राष्ट्रवादीचे माजी खासदार समीर भुजबळ यांचा कोठडीतील मुक्काम वाढला आहे. समीर यांच्यावतीने मुंबई हायकोर्टात जामिनासाठी करण्यात आलेल्या अर्जावरील सुनावणी आज ५ जूनपर्यंत तहकूब करण्यात आली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना याच प्रकरणात हायकोर्टाने ४ मे रोजी जामीन मंजूर केला होता. त्यानंतर समीर भुजबळ यांनी नव्याने हायकोर्टात जामीन अर्ज करून समानतेच्या आधारावर आपणासही जामीन मिळावा, अशी विनंती केली.

समीर यांच्या जामीन अर्जावर आज तिसऱ्यांदा सुनावणी झाली. मात्र, ईडीतर्फे युक्तिवाद पूर्ण होऊ शकला नाही. यावेळी काही प्रश्नांची उत्तरे अतिरिक्त सॉलिसीटर जनरल यांना देता आली नाहीत. त्यामुळे हायकोर्टाने सुनावणी ५ जूनपर्यंत तहकूब केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)