समीर भुजबळांचा जामीन लांबणीवर

पुढील सुनावणी 5 जून रोजी
मुंबई – राजधानी नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनासह अनेक गैरव्यवहारांप्रकरणी मनी लॉडरिंग कायद्यांतर्गत दोन वर्षे अटकेत असलेल्या समीर भुजबळ यांच्या जामीन अर्जावरील निर्णय लांबणीवर पडला आहे. न्यायालयाने अर्जाची पुढील सुनावणी 5 जूनपर्यत तहकूब ठेवली आहे. समीर यांच्या अर्जाला ईडीने जारेदार विरोध करताना सर्वोच्च न्यायालयाने एमएलए कायद्यातील कलम रद्द केल्यानंतर त्यात दुरूस्ती करण्यात आल्याने समीर यांना जामीन देता येणार नाही, असा दावा केला आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना उच्च न्यायालयाने जामीन दिल्यानंतर समीर भुजबळ यांच्या जामीन मिळण्याचा मार्ग सुखकर झाला होता. मात्र त्या जामीन अर्जाची सुनावणी लांबणीवर पडल्याने समीर यांना जामिनासाठी आणखी काही दिवस प्रतिक्षा करावी लागणार आहे.

महाराष्ट्र सदन बांधकाम, कालीना येथील मध्यवर्ती ग्रथालयाच्या इमारतीचे बांधकाम, अंधेरी आरटीओ प्रकरण, मुंबई नाशिक हायवे टोल, वांद्रे येथील एमआयजी कॉलनी, नवी मुंबई हेक्‍स वर्ल्ड गृहप्रकल्प अशा अनेक प्रकल्पातून भुजबळ कुटूंबियांनी सुमारे 840 कोटीचा घोटाळा केल्याप्रकरणी ईडीने समीर भुजबळ आणि छगन भुजबळ यांना अटक केली होती.

गेल्याचा आठवड्यात छगन भुजबळ यांना उच्च न्यायालयाने जामीन मंजुर केला. तर समीर भुजबळ यांनी जामीन मिळावा म्हणून केलेला अर्ज न्यायालयालयात प्रलंबित होता. छगन भुजबळ यांच्या जामिनाविषयीच्या आदेशाची प्रत उपलब्ध होताच समीर यांनाही तातडीने जामीन मंजूर करण्याची विनंती करणारा अर्ज ऍड. एस. के. सक्‍सेना यांनी उच्च न्यायालयात केला होता. त्या अर्जावर उच्च न्यायालयाच्या सुटीकालीन न्यायालयाचे न्यायमूर्ती अजय गडकरी यांच्या समोर आज सुनावणी झाली. उभयपक्षांच्या युक्तीवादानंतर न्यायालयाने अर्जाची पुढील सुनावणी 5 जूनपर्यंत तहकूब ठेवली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)