समीर कच्छीकडून पुन्हा तडीपारीचा भंग

 

सातारा, दि. 8 (प्रतिनिधी) – सातारा शहरातील कुख्यात मटकाकिंग समीर कच्छीला पोलिसांनी पुन्हा अटक केली. समीर तडीपारीचा आदेश भंग करून सातारा शहरात फिरत होता. त्यावेळी स्थानिक गुन्हे शाखेने त्याला ताब्यात घेतला.
समीर कच्छी याच्यावर अवैध मटका चालवल्याप्रकरणी सातारा शहर, सातारा तालुका, शाहूपुरी पोलिस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत. याशिवाय मारहाणीचे काही गुन्हे दाखल असल्याने त्याला सातारा जिल्ह्यातून तत्कालीन जिल्हा पोलिस प्रमुख संदीप पाटील यांनी तडीपार केले आहे. तडीपारीची कारवाई असतानाही तो साताऱ्यात खुलेआम होता. रविवारी रात्री तो साताऱ्यात फिरत असल्याची माहिती एलसीबीला मिळाली. पोलिसांनी मोळाचा ओढा येथे त्याच्या मुसक्‍या आवळल्या.
यापुर्वीही समीरला 29 सप्टेंबर रोजीही साताराचे उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन राजमाने यांच्या पथकाने समीर कच्छीच्या घरी (रा. सैदापूर) छापा टाकला. यावेळी पोलिसांनी महागड्या मद्यासह एलसीडी, प्रिंटर, झेरॉक्‍स मशिन, संगणक, जुगार खेळण्याचे साहित्य तसेच रोख रक्कम असा सुमारे एका लाखाचा मुद्देमाला जप्त केला होता. दरम्यानच्या काळात समीरला पोलिसांनी चांगलाच खाक्‍या दाखवल्याची चर्चा होती. पोलिसांच्या खाक्‍यामुळे समीर पुन्हा लवकर साताऱ्यात येणार नाही, असाच पोलिसांसह नागरिकांचा कयास होता. मात्र, समीरने आठवडा उलटण्याच्या आतच साताऱ्यात पावलं ठेवली.
पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि विकास जाधव, पोलिस हवालदार बंडा पानसंडे, प्रवीण फडतरे, निलेश काटकर, मोहसीन मोमिन,शरद बेबले, संजय जाधव यांनी कारवाईत सहभाग घेतला. याप्रकरणी मोहसीन मोमिन यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)