समित कक्कड घेऊन येत आहेत…‘बच्चन’

मराठी सिनेजगतात नवनवीन विषय आणि आशयाचे चित्रपट आपल्यासमोर येताहेत. त्यांची व्याप्ती पहाता त्यांच्या सादरीकरणाची कल्पना येते. असाच एक जबरदस्त विषय लवकरच मराठी रूपेरी पडद्यावर आकारास येणार आहे. ‘एव्हीके एंटरटेन्मेंट’ आणि ‘पर्पल बुल एंटरटेन्मेंट’ एक महत्त्वाकांक्षी चित्रपट आपल्यासमोर घेऊन येत आहेत … ‘बच्चन’. आजच्या पिढीचा तरूण, तंत्रकुशल दिग्दर्शक समित कक्कड या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळणार आहे.

‘लय भारी’ सारखा ‘माईल स्टोन’ चित्रपट दिल्यानंतर ‘एव्हीके एंटरटेन्मेंट’ने ‘येरे येरे पैसा’ सारखा धम्माल पैसावसूल चित्रपट दिला. ‘व्यक्ती आणि वल्ली’, ‘सौजन्याची ऐशी तैशी’, ‘शांतेचं कार्ट चालू आहे’ यांसारख्या दर्जेदार नाटकांची निर्मिती करत अमेय विनोद खोपकर यांची ‘एव्हीके एंटरटेन्मेंट’ संस्था, मनोरंजन क्षेत्रात चौफेर मुशाफिरी करताना दिसतेय. यानंतर ते आत्ता काय घेऊन येणार ? याची चर्चा सिनेसृष्टीत रंगली आहे. तर ‘आयना का बायना’ आणि ‘हाफ तिकीट’ सारखे मनोरंजक आणि आशयघन चित्रपट दिग्दर्शक समित कक्कड यांनी दिलेत. त्यांच्या ‘हाफ तिकीट’ चित्रपटाने राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक बहुमान मिळवले असून जवळपास २८ नामांकित फिल्म फेस्टिवल्समध्ये ३१ मानाच्या पुरस्कारांनी समित कक्कड यांना गौरविण्यात आले आहे. विषयासोबत सादरीकरणावरही हुकूमत गाजविणारा हा दिग्दर्शक आता ‘बच्चन’ हा चित्रपट घेऊन आपल्यासमोर येणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘बच्चन’ या शीर्षकावरून चित्रपटाविषयीची तुमची उत्सुकता नक्कीच वाढली असेल. या ‘बच्चन’ मध्ये नेमकं काय असणार हे गुलदस्त्यात असलं तरी काहीतरी नक्कीच जबरदस्त घेऊन, ‘बच्चन’ आपल्यासमोर २०१९ मध्ये अवतरणार हे नक्की.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)