समाविष्ट गावांमधील विद्यार्थ्यांना मोफत बस सुविधा

चार महिन्यांसाठी प्रस्ताव : चऱ्होली, वडमुखवाडी, पुनावळे, रावेतला लाभ

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या चऱ्होली, वडमुखवाडी, रावेत आणि पुनावळे या समाविष्ट गावांमधील गोरगरिब मुलांना महापालिकेतर्फे मोफत स्कूल बस सुविधा पुरविण्यात येणार आहे. चार महिन्यांच्या कालावधीसाठी ही सुविधा देण्यात येणार आहे. त्यासाठी चार लाख रुपयांचा खर्च येणार असून याबाबतचा प्रस्वात स्थायी समितीसमोर दाखल करण्यात आला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

महापालिकेच्या शिक्षण विभागाअंतर्गत चऱ्होलीत पंडीत जवाहरलाल नेहरु प्राथमिक शाळा, वडमुखवाडी प्राथमिक शाळा आहे. या शाळेत येण्यासाठी विद्यार्थ्यांना दोन ते तीन किलोमीटरची पायपीट करावी लागत होती. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊन नये यासाठी विद्यार्थ्यांना बस सुविधा देण्याची मागणी स्थानिक नगरसेवकांनी केली होती. त्याचबरोबर पर्यवेक्षीका पुष्पा माने यांनी देखील मुले तीन किलो मीटर अंतरावरुन शाळेत येत असल्याचा अहवाल दिला होता.

त्याचबरोबर रावेत येथील बबनराव भोंडवे प्राथमिक शाळा, पुनावळे प्राथिमक शाळा, मुले प्राथमिक शाळा या शाळेतील अनेक विद्यार्थी गोरगरिब मजुरी करणाऱ्या कामगारांची आहेत. या विद्यार्थ्यांना अनेक वर्षांपासून “डोअर स्टेप’ या सामाजिक संस्थेमार्फत वाहतूक सुविधा पुरविण्यात येत होती. परंतु, त्यांची आर्थिक स्थिती नसल्याने त्यांनी नोव्हेंबर अखेर सुविधा देणे बंद केले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी बस सुविधा उपलब्ध नाही. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. पटसंख्या घटत आहे. या चारही शाळेतील विद्यार्थ्याच्या वाहतुकीचा खर्च त्यांचे पालक करु शकत नाहीत. विद्यार्थ्यांना वाहतूक सुविधा उपलब्ध करुन दिल्यास शाळेच्या पटसंख्येत आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेमध्ये वाढ होणार आहे. कोणीही प्राथमिक शिक्षणापासून वंचित राहू नये. त्यासाठी मोफत बस सेवा उपलब्ध करुन देण्याची मागणी करण्यात आली होती.

त्यानुसार या चारही शाळेतील विद्यार्थ्यांना महापालिका बस सुविधा देणार आहे. या शाळांमध्ये एकूण 485 विद्यार्थी आहेत. त्यांना जानेवारी ते एप्रिल 2019 या चार महिन्याच्या कालावधीत सन 2018-2019 च्याच मंजूर दरानुसार प्रतिविद्यार्थी 11 रुपये 50 पैसे रुपये प्रमाणे सुविधा देण्यात येणार आहे. प्रत्येक स्कूल बसमध्ये महिला मदतनीस असणार असून त्यांना दरमहा सात हजार रुपये मानधन देण्यात येणार आहे. मेसर्स प्रेम टुर्स अॅण्ड ट्रॅव्हल्स या वाहतूक एजन्सीकडून ही सेवा पुरविण्यात येणार आहे. त्यासाठी चार लाख दहा हजार रुपये खर्च येणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)