समान वेतनासाठी कामगारमंत्र्यांना भेटणार- वाकचौरे

 बीएसएनएल कंत्राटी कामगार मेळावा
कायम कामगारांप्रमाणे आरोग्यसेवा मिळाव्यात
ठेकेदाराबरोबर पीएफ न बदलण्याची मागणी

शिरसगाव – असंघटित कामगार राज्य आणि देशपातळीवर संघटित होण्याची गरज आहे. त्यानेच प्रश्‍न मार्गी लावण्यास सोपे होईल. समान कामास समान वेतन लागू करण्यासाठी दोन दिवसांत केंद्रीय कामगारमंत्री बंडारू दत्तात्रय आणि दूरसंचारमंत्री मनोज सिन्हा यांची भेट घेणार आहे, असे आश्‍वासन माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी दिले. शिर्डी येथे आयोजित बीएसएनएलच्या जिल्हा कंत्राटी कामगार मेळाव्यात ते बोलत होते.

बीएसएनएलच्या कामगारांना पगार वेळेवर मिळत नाहीत. किमान वेतन कायद्याप्रमाणे अदा केले जात नाहीत. सर्वोच्च न्यायालय निर्णयाप्रमाणे समान कामास समान वेतन मिळावे, याच खात्यामध्ये कायम कामगारांना 50 हजारापर्यंत वेतन दिले जाते; त्याच कामासाठी कंत्राटी कामगारांना 5 ते 8 हजार रुपयांपर्यंत पगार दिला जातो हे अन्यायकारक आहे, असा सूर बीएसएनएल कामगारांमधून उमटला.

इपीएफच्या संदर्भात प्रत्येक ठेकेदाराबरोबर कामगारांचा इपीएफचा अकाउंट क्रमांकही बदलला जातो. तो एकच असावा. कायम कामगारांप्रमाणे आरोग्य व इतर सर्व सुविधा मिळाव्यात, अशा अनेक समस्या कर्मचाऱ्यांच्या आहेत. त्यात काही कामगारांना महिन्यातून दहा ते पंधरा दिवस काम नेमून दिले जाते. काही कामगारांचे वर्षभरासाठी ठेकेदार चेक जमा करून घेत असतो, अशा अडचणी कामगारांनी खा. वाकचौरेंसमोर मांडल्या.
कामगार नेते सुभाष कुलकर्णी, भैरवनाथ वाकळे, महेबूब सय्यद, अशोक हिंगे, सुनील धर्माधिकारी यांनी मेळाव्यात मार्गदर्शन केले.

ज्ञानदेव पाचर्णे, बाबासाहेब डांगे, सोमनाथ बढे, विजय गायकवाड, धोंडिराम वाघ, गणेश जाधव, राजू ताठे, प्रताप धनवटे, सुशील गोरे, अर्जुन कोलते, अमृत रहाट, अंबादास शहाणे, गणेश भोसले, रंगनाथ वैद्य, विजय डमाळे, सुनील कुलकर्णी, अशोक खांदे, अण्णा गोरे, शरद म्हसे, शिवाजी बर्डे यावेळी उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)