समान निधी योजनेसाठी 75 लाख

पुणे – केंद्र शासनाच्या राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानच्या समान निधी योजनेसाठी 75 लाख रुपये वितरीत करण्यात येणार असून त्यास राज्य शासनाकडून मान्यता देण्यात आली आहे.

प्रतिष्ठानचे अंशदान व राज्य शासनाचे अंशदान यांच्या संयुक्त सहभागाने पन्नास-पन्नास टक्‍के या प्रमाणातील निधीमधून समान निधी योजना कार्यरत करण्यात आली आहे. चालु वर्षाच्या अर्थसंकल्पात राज्य शासनाने 2 कोटी 50 लाख रुपये इतका निधी अर्थसंकल्पीत केला आहे. या योजनेअंतर्गत ग्रंथालयांना ग्रंथ, संगणक, झेरॉक्‍स मशीन, कपाटे, परिसंवाद, इमारत बांधकाम याबांबीवर खर्च करण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जातो. शासनाने 70 टक्‍के निधीच्या मर्यादेत 1 कोटी 75 लाख रुपये निधी वितरीत करून खर्च करण्यास पूर्वीच ग्रंथालय संचालकांना मान्यता देण्यात आली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आता त्यानंतर 30 टक्‍के निधीसाठी ग्रंथालय संचालकांकडून प्रस्ताव प्राप्त झाला होता. नुकतीच त्यास मान्यता देण्यात आली आहे. खर्च करण्यासाठी ग्रंथालय संचालनालयाचे ग्रंथालय संचालक यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित केले आहे. अनुदानाच्या रकमेची उपयोगिता प्रमाणपत्रे ग्रंथालयांनी मुदतीत सादर करणे आवश्‍यक राहणार आहे, असे उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे कार्यासन अधिकारी अनिल सावरे यांनी आदेशात नमूद केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)