समान तारखांमुळे विद्यार्थी एनडीएच्या प्रवेशाला मुकणार?

संग्रहित छायाचित्र

पुणे – राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत (एनडीए) प्रवेश घेण्यासाठी इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर शारीरिक आणि बौद्धिक आव्हानांसोबतच प्रशासनिक आव्हाने देखील वाढली आहेत. एसएसबी मुलाखत आणि सीबीएसईच्या 12 बोर्डाच्या परीक्षेच्या तारखा एकाच वेळी असल्याने यंदा देशभरातील तब्बल 142 विद्यार्थ्यांना प्रबोधिनीच्या मुलाखतीपासून वंचित राहवे लागणार आहे. यासंदर्भात विद्यार्थ्यांनी थेट संरक्षण मंत्रालयाकडे तक्रार केली आहे.

एनडीएमध्ये प्रवेश घेण्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांना केंद्रीय लोकसेवा आयोगाची लेखी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या एसएसबी मुलाखतीसाठी बोलावले जाते. यंदा एसएसबी मुलाखत आणि 12 वी बोर्डाच्या प्रात्यक्षिक आणि लेखी परीक्षेच्या तारखा जानेवारी ते मार्च महिन्यात एकाच वेळी असल्याने सुमारे 142 विद्यार्थी हे प्रबोधिनीची लेखी परीक्षा उतीर्ण होऊन देखील मुलाखतीला जाऊ शकणार नाही. यामुळे विद्यार्थांकडून नाराजी व्यक्‍त केली जात आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यातील काही विद्यार्थ्यांनी थेट संरक्षण मंत्रालयाकडे धाव घेतली असून, या प्रकाराची दखल घेऊन मुलाखतीच्या तारखा बदलण्यात याव्यात, अशी विनंती मंत्रालयाकडे केली आहे. याची दखल घेत या प्रकाराची चौकशी करून पुढील निर्णय घेणार असल्याचे मंत्रालयाच्या अधिकृत प्रवक्‍त्यांकडून ट्विटरच्या माध्यमातून सांगण्यात आले आहे.

दरम्यान, आतापर्यंत ही मुलाखत प्रक्रिया नोव्हेंबर महिन्यात होत असे. मात्र, गेल्या दोन-तीन वर्षांपासून आयोगाची लेखी परीक्षा सप्टेंबरमध्ये घेण्यात येत आहे. त्यामुळे साहजिकच परीक्षांचे निकाल उशिरा लागून मुलाखतीच्या तारखादेखील उशिरा जाहीर होताहेत. त्यामुळे 12 वी बोर्डाची परीक्षा, सीईटी, नीट यांसारख्या परीक्षांची तयारी करणे अतिशय कठीण ठरत आहे. पुढील वर्षी तर लेखी परीक्षा नोव्हेंबरमध्ये होणार असल्याने विद्यार्थ्यांपुढील आव्हाने अधिकच वाढणार असल्याचे कर्नल प्रदीप ब्राह्मणकर (नि.) यांनी सांगितले. तसेच लेखी परीक्षा पूर्वीप्रमाणे ऑगस्ट महिन्यात घेतली जावी, असे मत ब्राह्मणकर यांनी व्यक्‍त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)