सणसवाडी-गावागावांत सध्या अनेक प्रकारे वादविवाद उत्पन्न होत आहेत. हे थांबवण्यासाठी सामाजिक स्वास्थ्य राखण्यासाठी गावांत पोलीस पाटील महत्वाचे पद असून पोलीस पाटलाच्या शब्दाला एक विशिष्ट किंमत असून त्यांचा उपयोग दुर्बलांना साहाय्य म्हणून झाला पाहिजे, असे मत शिरूर हवेलीचे आमदार बाबुराव पाचर्णे यांनी सणसवाडी व्यक्त केले.
सणसवाडी येथे शिरूर तालुक्‍यातील नवनिर्वाचित पोलीस पाटलांचा सत्कार व मार्गदर्शन सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पोलीस पाटील संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष बाळासाहेब शिंदे होते. यावेळी आमदार पाचर्णे म्हणाले पोलीस पाटलांच्या विविध मागण्यांसाठी विधी मंडळात व मुख्यमंत्री यांच्याशी आपण चर्चा करू. यावेळी पोलीस पाटलांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सनद प्रदान करण्यात आली.
जि. प.चे माजी सभापती मंगलदास बांदल म्हणाले, पोलीस पाटलांनी जनतेचा विश्वास संपादन करावा. हे पद गाव पातळीवर व प्रशासनात महत्त्वाचा दुवा आहे. यावेळी कार्यक्रमास भाजपा संपर्कप्रमुख धर्मेंद्र खांडरे, घोडगंगा साखर कारखान्याचे माजी संचालक कैलास सोनवणे, रांजणगाव गणपती ट्रस्टी विजयराज दरेकर, तसेच पोलीस पाटील संघटनेचे पश्‍चिम महाराष्ट्र अध्यक्ष दादा पाटील काळभोर, जिल्हा अध्यक्ष रोहिदास शिंदे, उपाध्यक्ष राजेश गायकवाड, दत्तात्रय रानवडे, सचिव विठ्ठल बारवकर, महिला सदस्य अनिता वाजे, महिला आघाडी प्रमुख तृप्ती मांडेकर, कार्याध्यक्ष विजय कुंजीर पाटील, सारिका पाचुंदकर, मारुती शेलार, तालुका माजी अध्यक्ष राजाराम चोरे, तसेच तालुक्‍यातील सर्व पोलीस पाटील उपस्थित होते. यावेळी शिरूर तालुका अध्यक्ष म्हणून पांडुरंग नर्के पाटील यांची नावड करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दादा पाटील काळभोर, सूत्रसंचालन सचिव भास्कर ओव्हाळ, तर बाळासाहेब भुजबळ यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)