समाज माध्यमांतून सैन्याची प्रतिमा मलीन करण्याचा डाव

मेजर ए. एस कार्की; एम. आय. आर. सीतील 391 जवानांचा शपथ ग्रहण सोहळा
नगर – समाज माध्यमातून समाजात दुफळी निर्माण करणारे संदेश प्रसारित केल्याने देशांतर्गत अराजक निर्माण होत आहे. त्याचबरोबर सैन्याविषयी गैरसमज पसरविणारा मजकूर टाकून सैन्याची, देशाची प्रतिमा मलीन करण्याच प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे अंतर्गत अराजकतेचा मोठा धोका निर्माण होत असल्याचा इशारासदर्न कमांडचे मेजर ए. एस कार्की यांनी दिला.
एम. आय. आर. सी. तील अखौरा कवायत मैदानावर आयोजित 391 नव्या जवानांच्या शपथ ग्रहण प्रसंगी ते बोलत होते. या समारंभाला कर्नल डिसोझा, ब्रिगेडियर बी.बी. सुब्रमण्यम व अन्य प्रमुख अधिकारी आणि लष्करात नव्याने दाखल झालेल्या जवानांचे पालक, आप्तेष्ट मोठ्या संख्येने उपस्थित होते.
देशासमोर अनेक आव्हाने उभी असून त्यात फेसबुक ,व्हॉटस्‌ऍप सारख्या समाज माध्यमांतून प्रसारित होणाऱ्या संदेशांमुळे धार्मिक, प्रांतीय तेढ निर्माण केली जात आहे. यापासून सर्वांनी आणि विशेषतः सैन्यातील जवानांनी सावध राहिले पाहिजे. आज तुम्ही लष्करात दाखल झाला आहात. देशरक्षण हेच तुमचे ब्रीद आणि तुमचा गणवेष हाच तुमचा धर्म असल्याने त्याला साजेशी तुमची वागणूक ठेवली पाहिजे. तुमची कवायत अव्वल दर्जाची असून तुम्ही 36 आठवड्यांत घेतलेल्या खडतर प्रशिक्षणातून तुमचे सैनिकात रुपांतर झाले आहे. तुमचा गौरव हा सैन्याचा गौरव असतो, तो वाढवाल असा विश्‍वास त्यांनी या वेळी व्यक्त केला.
सकाळी 6.30 वाजता शपथग्रहण सोहळ्याला सुरुवात झाली. शिस्तबद्ध कवायत करत अखौरा कवायत मैदानात प्रवेश केलेल्या जवानांची मेजर ए.एस कार्की यांनी पाहणी केली. धर्मग्रंथावर हात ठेवून जवानांनी देश रक्षणाची आणि वेळप्रसंगी बलिदान देण्याची शपथ घेतली. प्रशिक्षणादरम्यान ज्या जवानांनी विषेश नैपुण्य दाखविले, त्यांचा पदक बहाल करून सन्मान करण्यात आला. यात जवान सूरज शर्मा यांना जनरल सुंदरजी यांच्या नावाने दिले जाणारे सुवर्णपदक, जवान केशव बिष्टा यांना जनरल के.एल. डिसोझा रजतपदक तर जवान अरविंद गुर्जर यांना जनरल पंकज जोशी कास्य पदकाने सन्मानित करण्यात आले. या सोहळ्यानंतर शपथ घेतलेल्या जवानांच्या मात्या-पित्यांना जवानांच्या हस्ते गौरवपदक देवून सन्मानित करण्यात आले.
चार मुले सैन्यात आता नातूही!
या शपथ ग्रहण सोहळ्याला लखनौ येथून आलेल्या शफिक अहमद या वयोवृद्ध आजोबांना त्यांची प्रतिक्रिया विचारली असता “मुझे गर्व है मेरे चार बेटे फौझ मे है और आज मेरा पोता भी फौझमे भरती हुआ है,” असे ते म्हणाले. त्यांच्या कन्येच्या मुलाने शपथ ग्रहण सोहळ्यासाठी त्यांना आवर्जून बोलविले होते.
माझा एकुलता एक मुलगा सैन्याला
कोल्हापूर येथून आलेल्या लतिका कागले यांनी, “माझा एकुलता एक मुलगा लष्करात भरती झाल्याने मला त्याचा अभिमान आहे. त्याला सुरुवातीपासूनच सैन्यात जायची आवड होती. या निमित्ताने त्याचे ध्येय पूर्ण झाल्याचाही आनंद वाटतो,” अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)