समाज मनाचा आरसा म्हणजे कविता

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष विजय कोलते

कापूरव्होळ : डिजिटल युगात विद्यार्थ्यांनी वाचन संस्कृती रुजवावी व काव्य वाचनातून जीवनाचे तत्वज्ञान आत्मसात करावे. स्वातंत्र्यपूर्व काळात अनेक कवींनी कवितेच्या माध्यमातून स्वातंत्र्याची ज्योत सर्वसामान्य समाजात रुजवली. स्वातंत्र्य लढ्यामध्ये कवितेचे मोठे योगदान आहे. विद्यार्थ्यांनी मध्ययुगीन काळापासून आधुनिक काळापर्यंतच्या कवितांमधून बदलत्या सांस्कृतिक, पर्यावरणाचा आढावा घेतला पाहिजे.साहित्य हा समाजाचा आरसा असतो आणि बदलत्या संस्कृतीचे प्रतिबिंब कवितेतून सहजरीत्या प्रकट होत असते, असे मत 87 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष विजय कोलते यांनी व्यक्त केले.
नसरापूर (ता. भोर) येथील शंकरराव भेलके महाविद्यालयातील मराठी विभाग व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, विद्यापीठ विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने “बदलते सांस्कृतिक पर्यावरण व मराठी कविता’ या विषयावर आधारित दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी ते बोलत होते. चर्चासत्रामध्ये बेळगाव, गोवा, हिमाचल प्रदेश, कर्नाटक, छत्तिसगढ, मध्यप्रदेश व महाराष्ट्रातील विविध महाविद्यालयांतील 93 प्राध्यापक सहभागी झाले होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे उपसचिव एल. एम. पवार, खजिनदार मोहन देशमुख, एल. एम. पवार, प्राचार्य डॉ. आर. व्ही. ढेरे, डॉ. अलका तालनकर, ज्येष्ठ शास्त्रज्ञ एस. व्ही. नाईक, जगदीश शेवते उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. संदीप लांडगे यांनी केले तर डॉ. विशाल पावसे यांनी आभार मानले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)