समाज मंदिर बनले भटक्‍या कुत्र्यांचा निवारा

लाखों रुपयांचा खर्च केला वाया

लाखणगाव- आंबेगाव तालुक्‍याच्या पूर्व भागातील काठापूर बुद्रुक येथील समाज मंदिराची दुरवस्था झाली असून यांच्या बांधकामासाठी केलेला लाखों रुपयांचा खर्च व्यर्थ गेल्याचे दिसून येत आहे. सध्या समाज मंदिर भटक्‍या कुत्र्यांचा निवारा बनल्याचे चित्र दिसत आहे.
सरकारकडून मिळालेल्या निधीच्या माध्यमातून काठापूर बुद्रुक येथे समाज मंदिर उभारले आहे. मिळालेल्या निधीतून अँगल उभारुन त्यावर पत्राशेड मारुन खाली फरशी बसविली आहे; परंतु बाकी कोणत्याच प्रकारची संरक्षणात्मक उपाययोजना न केल्याने सध्या हे समाज मंदिर समाजातील कोणत्याही घटकाला वापरता येत नाही. त्याचा वापर भटक्‍या कुत्र्यांचा निवारा म्हणूनच सध्या होत आहे. त्याचप्रमाणे या समाज मंदिराच्या आजूबाजूच्या परिसरातही काट्या-कुट्या आणि इतर गोष्टी टाकल्याने हे समाज मंदिर नक्‍की कुणासाठी आहे, असा प्रश्‍न ग्रामस्थांना पडला आहे.
सरकारच्या वतीने मोठ्या प्रमाणावर विविध ग्रामपंचायतींना अनेक योजना राबविण्यासाठी निधी दिला जातो; परंतु हा निधी वापरत असताना किंवा या निधीतून उभारलेली विकास कामे चांगली होत नाहीत. ग्रामपंचायतीला दिलेला निधी हा मातीमोल होत असल्याचे चित्र अनेक ठिकाणी पहावयास मिळत आहे. अनेक गावांमध्ये अनेक विकासाची कामे केली जातात; परंतु काही दिवसानंतर केलेल्या कामांची कोणतीही देखभाल ग्रामस्थांच्या माध्यमातून ठेवली जात नाही. त्यामुळे होणारी कामे निकृष्ट दर्जाची होतात. पर्यायाने सरकारचा मोठा निधी वाया जातो.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)