समाजात वावरताना अधिकारांसह कर्तव्याची जाणीव ठेवा

यवत- समाजात वावरताना अधिकारांच्या बरोबरच कर्तव्याची देखील जाणीव ठेवा, असे मत दौंड न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश सचिन कुरणे यांनी व्यक्त केले आहे. ते दौंड तालुका विधी सेवा समिती आणि दौंड बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी (दि.29) दौंड तालुक्‍यातील भांडगाव येथे ग्रामपंचायत कार्यालयात नागरिकांसाठी कायदेविषयक सल्ला शिबीर आयोजित कार्यक्रमामध्ये बोलत होते.
यावेळी कुरणे पुढे ते म्हणाले, समाजात वावरताना समानता जपणे गरजेचे आहे. कायदा हा सर्वांसाठी समान असून यात भेदभाव केला जात नाही. कायदेविषयक शिबिरांचा नागरिकांनी लाभ घेतला पाहिजे, असे मत त्यांनी बोलताना व्यक्त केले. यावेळी प्रशांत गिरमकर यांनी मानवी हक्क या विषयावर तर कांबळे यांनी बालहक्क या विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी न्यायाधीश श्रीमती अवसेकर, लंबे आणि मनगिरे तसेच वकील संघटनेचे अध्यक्ष मदन जगदाळे उपाध्यक्ष कांबळे, सचिन साने, विष्णू माने, तहसीलदार बालाजी सोमवंशी, पंचायत समिती सदस्य नितीन दोरगे, सरपंच कमल टेळे, उपसरपंच रविंद्र दोरगे, मंडलाधिकारी विजय खारतोडे, कोकरे, तलाठी रमेश कदम, रामदास दोरगे यांच्यासह आदी मान्यवर व नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिन साने यांनी केले तर सूत्रसंचालन उपसरपंच रविंद्र दोरगे यांनी केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)