समाजातील महिलांचे रक्षण केल्यास वाढत्या अत्याचाराच्या घटना थांबतील

वडगाव मावळ : येथील पोलीस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना राखी बांधताना डी.एड. कॉलेजच्या विद्यार्थिनी.

वडगाव मावळ – केवळ आपल्याच भावांना राखी न बांधता अन्य भावांना राखी बांधल्याने तुमच्या संरक्षणासाठी अनेक भाऊ उभे राहतील. भावांनी केवळ आपल्याच बहिणीचे रक्षण न करता इतरांच्या बहिणीचे संरक्षण केल्यास मुलींच्यावरील वाढत्या अत्याचारांच्या घटना थांबतील. समाजातील महिला व नागरिकांचे संरक्षण करण्याचे कार्य सैनिक व पोलीस करीत असतात, असे प्रतिपादन पोलीस स्टेशनचे निरीक्षक डी. एस. हाके यांनी केले.

येथील श्री संत तुकाराम शिक्षण प्रसारक मंडळाच्या एच. आर. बाफना डी.एड कॉलेजच्या प्रथम व द्वितीय वर्षाच्या विद्यार्थिनींनी सोमवारी (दि. 27) रोजी वडगाव मावळ पोलीस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी आयोजित केलेल्या रक्षाबंधन कार्यक्रम ते बोलत होते. डी.एड कॉलेजचे प्राचार्य हिरामण लंघे यांच्या मार्गदर्शनाखाली प्राध्यापक राजेंद्र डोके, विजय रढे, शुभांगी हेंद्रे, शीतल गवई, योगेश जाधव तसेच कॉलेजच्या प्रथम व द्वितीय वर्षाच्या विद्यार्थिनींनी 24 तास सामाजिक सलोखा, कायदा व सुव्यवस्था ठेवण्याचे कर्तव्य करणारे. समाजाचे संरक्षण करणाऱ्या पोलीस दादांना राखी बांधण्यात आली. तसेच पोलीस ठाण्याच्या कोठडीत असलेल्या आरोपींनाही राखी बांधली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या वेळी पोलीस स्टेशनचे निरीक्षक डी. एस. हाके, सहाय्यक निरीक्षक गणेश लोकरे, कर्मचारी संदीप चौधरी, चंद्रकांत सोनवणे, विजय मालुसरे, सुभाष गोमे, सुनील साळुंखे, राजेश कर्डिले, राजेश पवार, प्रदीप शिंदे आदी उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)