समाजाचे नवनिर्माण तरुणाईच्या सहभागावर अवलंबून : विनित पवार

अण्णापूर-मराठ्यांच्या स्वातंत्र्य संग्रामात धारच्या श्रीमंत पवार घराण्याचे मोलाचे योगदान असून हा दैदीप्यमान इतिहास नवीन पिढीला माहित असणे गरजेचे आहे. इतिहासापासुन बोध घेत समाजाच्या नवनिर्माणासाठी तरुणाईने तयार असायला हवे कारण समाजाचे नवनिर्माण तरुणाईच्या सहभागावर अवलंबून असल्याचे मत श्रीमंत राजे पवार घराणे सामाजिक प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याचे सल्लागार विनित पवार यांनी व्यक्‍त केले.
श्रीमंत राजे पवार घराणे सामाजिक प्रतिष्ठान व अण्णापूर येथील पवार परिवार यांच्या वतीने दिवाळी पाडव्याच्या पूर्वसंध्येला पवार वाड्यातील विठ्ठल मंदिरात दीपोत्सव व पवार परिवारांचा स्नेहमेळावा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिरुर नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा समितीचे सभापती विठ्ठल पवार होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला अण्णापूरमधील बोल्हाईमाता मंदिर ते पवारवाड्यातील विठ्ठल मंदिरापर्यंत मिरवणूकीने पवार परिवारातील सर्व सदस्य आल्यानंतर श्रीमंत पवार घराणे सामाजिक प्रतिष्ठानचे मार्गदर्शक विनित पवार, उपाध्यक्ष मनोहर पवार, शिरुर नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा समितीचे सभापती विठ्ठल पवार व पुरुष व महिला सदस्यांनी विठ्ठल मंदिराच्या प्रांगणात दीपोत्सव साजरा केला. यावेळी दिव्यांच्या रोषणाईने पवारवाडा उजळून निघाला होता. पवार परिवारातील सर्व सदस्य यानिमित्ताने एकत्र आल्याने नव्या व जुन्या पिढीतील गप्पांना रंग चढला होता. यावेळी विविध क्षेत्रातील यशस्वी सदस्यांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी प्रतिष्ठानचे सदस्य गौरव पवार, माजी उपसरपंच मोहन पवार, हभप विलास महाराज पवार, दुध डेअरीचे चेअरमन हनुमंत पवार, पदवीधर शिक्षक संघटनेचे तालुकाध्यक्ष शहाजी पवार, उद्योजक सुरेश पवार, प्रा. सुभाष कुरंदळे, हभप रंगनाथ पवार, डॉ. कोमल पवार सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन ग्रामपंचायत सदस्य महेश कुरंदळे, उद्योजक संजय पवार, गहिनीनाथ डेकोरेटर्सचे प्रोप्रायटर भाऊसाहेब पवार, युवा नेते शंकर पवार, उमेश पवार, गणेश पवार, अमित पवार, अजित पवार, मराठा सेवा संघाचे उपाध्यक्ष शरद पवार, किरण पवार, राजेंद्र पवार, उद्योजक हनुमंत पवार, दादा पवार , वरुण पवार यांनी केले. प्रतिष्ठानच्या वतीने लवकरच आमदाबाद येथे राज्यस्तरीय मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे. येत्या 14 जानेवारीला कवठे येमाई येथील पवारांच्या गढीवर शौर्यदिनाचे आयोजन होणार आहे, अशी माहिती विठ्ठल पवार यांनी दिली. हभप विलास महाराज पवार यांनी प्रास्तविक, सूत्रसंचालन ब्रिटीश कौन्सिलचे राज्य मार्गदर्शक ज्ञानेश पवार यांनी केले. युवानेते वरुण पवार यांनी आभार मानले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)