समाजाची गरज ओळखून काम करणे गरजेचे : सी. एम. पाटील

 अंबवडे : येथील स्वरांजली कन्स्ट्रक्‍शनच्या कार्यक्रमात संगणकाचे उद्घाटन करताना बाजार समितीचे सभापती सी. एम. पाटील, समवेत विक्रीकर उपायुक्त बी. वाय. नेटके, संचालक राहुल पवार व इतर

वडूज, दि. 13 (प्रतिनिधी) – कोणत्याही क्षेत्रात काम करताना नवोदित युवकांनी समाजाची गरज ओळखून काम करावे. असे आवाहन बाजार समितीचे माजी सभापती सी. एम. पाटील यांनी व्यक्त केले.
अंबवडे (ता. खटाव) येथील स्वरांजली कन्स्ट्रक्‍शनच्या वतीने दिपावली निमित्त आयोजित केलेल्या ग्राहक, हितचिंतकांच्या स्नेह मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी माजी पंचायत समिती सदस्य रविंद्र पवार, मोहनभाऊ बुधे, सरपंच ऍड. संतोष पवार, विक्रीकर उपायुक्त बी. वाय. नेटके, खरेदी विक्री संघाचे संचालक शांताराम पवार, धनंजय क्षीरसागर, अजित पवार, हणमंतराव देशमुख, अंकुशराव पवार, अतुल पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
पाटील म्हणाले, आजकालच्या युवा वर्गामध्ये प्रचंड उर्जा आहे. या ऊर्जेचा वापर चांगल्या पध्दतीने होण्यासाठी युवकांना चांगले मार्गदर्शन मिळण्याची गरज आहे. स्वरांजली कन्स्ट्रक्‍शनने बांधकाम व्यवसायात कमी कालावधीत चांगला नावलौकीक मिळवला आहे. संस्थेचे सामाजिक बांधिलकीचे उपक्रम कौतुकास्पद आहेत. सर्व उपक्रमास तुळजाभवानी उद्योग समुहाच्या माध्यमातून सर्व प्रकारचे सहकार्य केले जाईल.
माजी सरपंच महादेव पवार यांनी प्रास्ताविक केले. संचालक राहुल पवार यांनी सुत्रसंचालन केले. किरण पवार यांनी आभार मानले. माजी सरपंच सुखदेव पवार, देविदास पवार, पोपट वाघ, नितीन घाडगे, पोपट पवार, सुनिल नेटके, शिवाजी पवार, शरद पवार, विश्वजीत घाडगे, अजित घाडगे, आदी उपस्थित होते.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)