समाजविकास अधिकाऱ्यांचे पंख छाटले

पिंपरी – महापालिकेचे समाज विकास अधिकारी संभाजी ऐवले यांच्याकडून महिला व बालकल्याण योजना अंमलबजावणीचे अधिकार काढून घेण्यात आले आहेत. या योजना राबविण्याचे अधिकारी त्यांचे कनिष्ठ सहकारी सहसमाज विकास अधिकारी सुहास बहाद्दरपुरे यांच्याकडे सोपविण्यात आले आहेत. प्रशासकीय कामकाजाच्या सोयीच्या दृष्टीने हा बदल करण्यात आल्याचे सहाय्यक आयुक्त स्मिता झगडे यांनी या आदेशात नमूद केले आहे. मात्र, ऐवलेंचे पंख छाटल्याची चर्चा महापालिका वर्तुळात आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नागरवस्ती विकास विभागाच्या वतीने महिला व बालकल्याण, मागासवर्गीय कल्याण, अपंग कल्याण व इतर कल्याण योजना राबविल्या जातात. त्यापैकी बहुतांशी योजना वर्षभर सुरू असतात. तर या योजना राबविण्यासाठी एम.एस.डब्ल्यू. ही पदव्युत्तर पदवीची शैक्षणिक पात्रता असणे आवश्‍यक आहे. मात्र, अद्यापही या विभागाला या शैक्षणिक अर्हता असलेला सहायक आयुक्त मिळालेला नाही. तर गेली वीस वर्षांपासून समाज विकास अधिकारी संभाजी ऐवले यांच्याकडे या चारही प्रकारच्या कल्याण योजना राबविण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. मात्र, दोन दिवसांपूर्वी या चार योजनांपैकी महिला व बालकल्याण योजना ऐवले यांच्याकडून काढून घेण्यात आला आहे.
ऐवले यांच्याकडून या योजनेचे अधिकार काढून घेतल्याची बाब लोकप्रतिनिधींना देखील फारशी रुचली नाही. महिला बालकल्याण समिती सभापती स्वीनल म्हेत्रे, सदस्या वैशाली काळभोर, आरती चोंधे यांनी झगडे यांच्या भूमिकेला विरोध करत अन्य सदस्यांसह आयुक्त श्रावण हर्डीकर यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यावर आपणाला न विचारता हा निर्णय घेण्यात आला असल्याचे हर्डीकरांनी त्यांना सांगितले. त्यावर सोमवारी (दि. 26) त्यांच्याशी सविस्तर चर्चा करण्याचे आश्‍वासन आयुक्त हर्डीकर यांनी दिले आहे.

सहाय्यक आयुक्‍त प्रतिनियुक्‍तीवरच
महापालिका आस्थापनेवर नागरवस्ती विकास योजना विभागासाठी सहाय्यक आयुक्त सामूहिक विकास या वर्ग एकच्या पदाला राज्य सरकारने 1989 साली मान्यता दिली आहे. मात्र, अद्यापही महापालिका सेवेतील सहाय्यक आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांच्या एम. एस.डब्ल्यु. पदवीबाबत संभ्रम आहे. त्यामुळे नागरवस्ती विभागाला अद्यापही प्रतिनियुक्तीवरील सहाय्यक आयुक्तांच्या मर्जीवर कारभार करावा लागत असल्याची महापालिका वर्तुळात जोरदार चर्चा आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)