समाजमाध्यमांतून उभारलं मुलांचं वाचनालय

file photo

पुणे – समाजमाध्यमं फार झालीत म्हणून मुलं हल्ली वाचत नाहीत अशी तक्रार असते. परंतु या समाजमाध्यमातूनच मुलांसाठीचं वाचनालय उभारण्यात एका शिक्षकाला यश आलं आहे. जालना जिल्ह्यापासून पाच किलोमीटरवर असलेल्या एका शिक्षकांने सोशल मिडियावर मुलांसाठी वाचनालय ही पोस्ट टाकली व चार महिन्यात एक हजारांहून अधिक पुस्तकांचा खजिना मुलांसाठी उपलब्ध झाला.

सध्या डॉ.प्रकाश आमटे यांच्यापासून ते अनेक प्रकाशनसंस्था, शिक्षणाधिकारी यांनी माझ्याकडे पुस्तके पाठविली आहे. सद्यस्थितीत माझ्याकडे एक हजार पेक्षा अधिक पुस्तके जमा झालीत. यात कांदबरी, कविता संग्रह, बालसाहित्य, बोधात्तक गोष्टींची पुस्तके, विज्ञान विषयक पुस्तके आहेत.भविष्यात मी मुलांसाठी पाच हजार पुस्तके उपलब्ध करणार आहे. या उपक्रमातून मुलं स्वत:चा विचार स्वत: करायला शिकतील.
संतोष मुसळे, शिक्षक
गुंडेवाडी, जालना

सध्या शालेय शिक्षण विभागाकडून उपक्रमशील शिक्षक असाही एक उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यांतर्गत अनेक शिक्षक आपल्याला आपल्या शाळेत नविन काय करता येईल याचा विचार करत आहेत. जालना जिल्ह्यापासून जालना शहरापासून पाच किमी अंतरावर वसलेल्या गुंडेवाडी या गावात संतोष मुसळे या शिक्षकाने असाच एक उपक्रम हाती घेतला आहे. त्याला सर्व स्तरातून चांगला प्रतिसादही मिळत आहे. दिवाळीच्या सुटीत व उन्हाळ्याच्या सुटीत विद्यार्थ्यांनी मोबाईल हातात घेऊन बसण्यापेक्षा वाचनाकडे लक्ष द्यावे या दृष्टीकोनातून सुरु झालेला हा छोटा उपक्रम आता सर्व शाळेसाठी पुरेल इतकी पुस्तकांची बॅंक तयार करण्याच्या प्रयत्नात आहे.

याबाबत माहिती देताना शिक्षक संतोष मुसळे म्हणाले, जून 2015 मध्ये माझी या शाळेत बदली झाली. निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या माझ्या शाळेचा परिसर खुपच रम्य आहे. मात्र शाळेतील मुलांना व्यक्त होतांना अडचण यायची. मुलं शालेय पुस्तकांचे वाचन आवडीने करत नसत. यावर उपाय म्हणून मी मुलांना अवातंर पुस्तके वाचनाचा छंद लावला. मला वाचनाची आवड असल्यामुळे मी सातत्याने घरी नवनवीन पुस्तके आणायचो यात माझी मुलगी स्वरा सात वर्षाची असल्यामुळे मी तिच्यासाठीसुद्धा छोटी छोटी गोष्टीची पुस्तके आणली.ती तिला आवडली; तिच पुस्तके मी माझ्या शाळेतील पहिली दुसरीच्या मुलांना वाचायला दिली त्यांनी ती आवडीने वाचली. यावरून माझ्या लक्षात असे आले की, मुलं वाचनपुरक पुस्तके आवडीने वाचतात.

जून 2017 मध्ये मी सोशल मिडीयाच्या माध्यमातून “मुलांसाठी वाचनालय” आशा प्रकारची पोस्ट शेअर करायला लागलो आणि बघता बघता अवघ्या चार महिनयात मला माझ्या हिंतचिंतकांकडून तब्बल एक हजार पुस्तके प्राप्त झाली. जशी जशी पुस्तके प्राप्त होत गेली तशी तशी मी मुलांना ती वाचायला द्यायला लागलो. दुपारच्या दीर्घ मध्यतंरात तसेच शाळा सुटल्यानंतर सप्ताहात दोनदा मुलांना घरी सोबत पुस्तक द्यायला लागलो. मुलांना ही पुस्तके खूप आवडली सोबतच घरी मुलांच्या आईवडीलांनी सुद्धा ही पुस्तके वाचून काढली.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)